• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Nakaab: मल्लिका शेरावतने ईशा गुप्तासोबत दिले इंटिमेट सीन; म्हणाली अभिनेत्रीसोबत असं करणं...

Nakaab: मल्लिका शेरावतने ईशा गुप्तासोबत दिले इंटिमेट सीन; म्हणाली अभिनेत्रीसोबत असं करणं...

नुकताच मल्लिका 'नकाब'(Nakaab) या वेबसिरीजमध्ये दिसून आली होती. यामध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावतने ईशा गुप्तासोबत(Isha Gupta) इंटिमेट सीन दिले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर- अनेक वर्षांनंतर अभिनेत्री मल्लिका शेरावत(Mallika Sherawat) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच मल्लिका 'नकाब'(Nakaab) या वेबसिरीजमध्ये दिसून आली होती. या वेबसिरीजमुळे ती खूपच चर्चेत आहे. कारण यामध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावतने ईशा गुप्तासोबत(Isha Gupta) इंटिमेट सीन दिले आहेत. त्यामुळे तिची जोरदार चर्चा होत आहे. मात्र मल्लिका शेरावतने याबद्दल बोलताना म्हटलं आहे, 'अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रीसोबत हे सीन देणं सोपं होतं'. मल्लिका शेरावतने 'ख्वाहिश' या चित्रपटात १७ किसिंग सीन देत खळबळ माजवली होती. मात्र तरीसुद्धा तिला एका अभिनेत्रीसोबत हे सीन देणं सोपं वाटतं.
  अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकताच स्पॉटबॉयला एक मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना तिन म्हटलं आहे, 'एका महिला कलाकारासोबत हे सीन देणं तितकसं कठीण नव्हतं. मात्र निश्चितपणे एका पुरुष कलाकारासोबत असे सीन देणं इतकं सोपं नसतं.मल्लिकाच्या या मुलाखतीने सर्वच हैराण आहेत. तसेच अभिनेत्री मल्लिका शेरावतला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिने अनेक चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन दिले आहेत. मात्र एका महिला कलाकारासोबत हे सीन देऊन ती चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री मल्लिका शेरावतने २००३ मध्ये 'ख्वाहिश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटात या अभिनेत्रीने तब्बल १७ किसिंग सीन देत खळबळ माजवली होती. तसेच 'मर्डर' चित्रपटातसुद्धा अभिनेता इम्रान हश्मीसोबत बोल्ड सीन देत चर्चेतआली होती. (हे वाचा:HBD: फक्त 'Bigg Boss'चं नव्हे तर राहुल वैद्यने या कार्यक्रमांतसुद्धा घेतला होता) मल्लिका शेरावतची नुकताच आलेली वेबसिरीज 'नकाब' एका हायप्रोफाइल २६ वर्षीय अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या अवती-भोवती फिरणारी आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजते. तसेच पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत असतात. यामध्ये एक मोठी हस्ती अडकते. पोलिसांना जोहरा मेहरा (मल्लिका शेरावत) वर संशय असतो. यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता अर्थातच पोलीस इन्स्पेकटर आदिती आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असते. (हे वाचा:'सर्व धर्म सम भाव'चा संदेश देत Sara Ali Khanने काश्मिरमधून शेअर केले PHOTO) अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकताच बॉलिवूड बबललासुद्धा एक मुलाखत दिली होती, यावेळी तिनं म्हटलं होतं, 'सध्या समाज विकसित झाला आहे. बोल्ड सीनबद्दल लोक सजग झाले आहेत. मात्र ज्यावेळी मी करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा असं नव्हतं मला माझ्या कामावरून जज केलं जायचं. मला एक चारित्र्य हीन स्त्री म्हटलं जायचं. मला कोणत्याच गोष्टींचा फरक पडत नाही असं समजलं जात होतं. मी बिकिनी घातली तरी त्यावर बोललं जात असे'. आज तसं नाही राहिलं लोकांसाठी आज या गोष्टी सर्वसामान्य बनल्या आहेत'.
  Published by:Aiman Desai
  First published: