'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत

'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत

मल्लिका शेरावतने एक खळबळजनक कबुली दिलीय. अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्यासोबत तडजोड करायला नकार दिल्यानेच आपल्याला अनेक सिनेमे हातचे गमवावे लागले असल्याची कबुली तिने दिलीय.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै : मल्लिका शेरावतने एक खळबळजनक कबुली दिलीय. अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्यासोबत तडजोड करायला नकार दिल्यानेच आपल्याला अनेक सिनेमे हातचे गमवावे लागले असल्याची कबुली तिने दिलीय. 2004 साली मर्डर या सिनेमात बोल्ड भूमिका केल्यामुळे आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक आपल्याकडून वैयक्तिक आयुष्यात याच गोष्टींची मागणी करायला लागले. ही तडजोड करायला नकार दिल्यानेच अनेक सिनेमे हातचे गेल्याची कबुली तिने दिलीय.

हेही वाचा

धक्कादायक! सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा

Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट

नोबल पुरस्कार विजेती मलालावरच्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

काय म्हणाली मल्लिका?

मला एका प्रोजेक्टमधून बाहेर काढलं, कारण मी को-स्टार हिरोला नकार दिला. तू माझ्याशी जवळीक का साधत नाही? ऑनस्क्रीन जवळ येऊ शकतेस मग एकांतात का नाही?  असा सवाल को-स्टारने विचारल्यावर मी त्याला नकार दिला. त्यामुळे चांगला प्रोजेक्ट हातातून गेला. आपण ज्याप्रमाणचे कॅरेक्टर करतो त्याप्रमाणेच आपल्याला समजलं जातं. जर तू शॉर्ट स्कर्ट घालत असशील, ऑन स्क्रीन किस केलं तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात देखील तशीच असते असा समज होतो.

मल्लिका शेरावत मर्डर आणि प्यार के साईड इफेक्टस सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय किस किस की किस्मत, ख्वाईश या सिनेमांमधल्या तिच्या भूमिका चर्चेत होत्या.

First published: July 4, 2018, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading