S M L

मुंबईची नवी धून, 'मलिष्का को मत सुन' !

"मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" म्हणत शिवसेनेच्या नाकीनऊ आणणाऱ्या 'मुंबईची राणी' अर्थात आरजे मलिष्का आता आणखी एक नवंकोरं गाणं घेऊन आलीये

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2017 10:15 PM IST

मुंबईची नवी धून, 'मलिष्का को मत सुन' !

 22 डिसेंबर : "मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का?" म्हणत शिवसेनेच्या नाकीनऊ आणणाऱ्या 'मुंबईची राणी' अर्थात आरजे मलिष्का आता आणखी एक नवंकोरं गाणं घेऊन आलीये.  'मलिष्का को मत सुन' असं हे अनोख कॅम्पेन आहे.

मुंबईचे खड्डे, ट्रॅफिक, सार्वजनिक ठिकाणी असलेला कचरा यावर ती भाष्य करतच असते. पण एखादी गोष्ट करु नका म्हटलं, तर ती जाणिवपूर्वक करण्याची काही जणांना सवय असते. हाच मुद्दा विचारात घेत मलिष्कानं विशेष कॅम्पेन सुरू केलंय 'मलिष्का को मत सुन..." त्याचाच भाग म्हणून मलिष्का 'हिल पोरी हिला' या गाण्याच्या चालीवर स्वत:च नवं गाणं घेऊन आलीय. "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का..?" या गाण्यानंतर आर जे मलिष्काचं हे नवं गाणं आता सत्ताधारी शिवसेनेला किती आवडतं हे आता पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 10:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close