मुंबई, 02 फेब्रुवारी : कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण या गोष्टी तसं पाहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये नव्या नाही. पण पूर्वी झालेल्या प्रकारावर गप्प बसणाऱ्या महिला किंवा अभिनेत्री ‘मी टू’ चळवळीनंतर उघडपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी बोलू लागल्या. दरम्यान बऱ्याच जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये दिसलेल्या एका अभिनेत्रीनं कास्टिंग काऊचबद्दल बोलताना, तिला एका 65 वर्षीय प्रोड्युसरनं कपडे उतरवण्यास सांगितलं होतं असा धक्कादायक खुलासा केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या वृत्तानुसार अभिनेत्री मल्हार राठौरनं काही दिवसांपूर्वी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला. यावेळी अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या दिवसात तिला कोणत्या समस्या आल्या याविषयी ती उघडपणे बोलली. ती म्हणाली, एका 65 वर्षीय प्रोड्युसरनं मला माझे कपडे उतरवण्यास सांगितले होते. त्यावेळी मी खूपच घाबरले होते. मला समजत नव्हतं की मी काय करावं.
मल्हार पुढे म्हणाली, मला लहान असतानाही अशा प्रसंगांना समोरं जावं लागलं होतं मात्र आता या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. याशिवाय एका अभिनेत्यानंही सांगितलं की, जर बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी टिकून राहणं कठिण असतं.
मल्हार राठौरनं बऱ्याच जाहिरातींमध्ये दिसली आहे. याशिवाय तिनं हॉटस्टारच्या ‘तेरे लिए ब्रो’, ‘सनसिल्क रिअल एफएम’, ‘होस्टेजेस सीरिज’मध्ये काम केलं आहे. मल्हारच्या अगोदरही बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्रींनी या ठिकाणी चालणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रिचा चढ्ढानं पिंकव्हिलाशी बोलाताना सांगितलं होतं की एका व्यक्तीनं तिला डिनरला बोलवण्याच्या उद्देशानं वाईट पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.