S M L

'ट्युबलाईट'मध्ये सलमानच्या 'एंट्री'वर चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके

मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये ट्युबलाईट पाहण्यासाठी ईदच्या दिवशी सुट्टी असल्यानं गर्दी झाली होती. सिनेमात सलमानचं गाणं सुरू झालं आणि चाहत्यांचा उत्साह बेकाबू झाला. चाहत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2017 08:02 PM IST

'ट्युबलाईट'मध्ये सलमानच्या 'एंट्री'वर चाहत्यांनी थिएटरमध्ये फोडले फटाके

28 जून : एखाद्या अभिनेत्याचे चाहते कोणत्या थराला जाऊ शकतात, हे मालेगावमध्ये बघायला मिळालं. थिएटरमध्ये ट्युबलाईट सिनेमा सुरू असताना सलमानच्या चाहत्यांनी उच्छाद मांडला. त्यांनी चक्क थिएटरमध्येच फटाके फोडून अनेकांचा जीव धोक्यात घातला.

भाईजान सलमान खानचा सिनेमा मग तो कसाही असला तरी त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. सलमानचा सिनेमा कधी रिलीज होणार याची त्याचे चाहते उत्सुकतेनं वाट पाहत असतात. आणि ते भाईजानसाठी काहीही करायला तयार असतात. कधीकधी या चाहत्यांना आवरणं आवाक्याबाहेरचं होऊन जातं. जसं मालेगावमध्ये झालं.

ईदच्या मुहुर्तावर सलमानचा ट्युबलाईट सिनेमा रिलीज झाला. मालेगावच्या मोहन थिएटरमध्ये ट्युबलाईट पाहण्यासाठी ईदच्या दिवशी सुट्टी असल्यानं गर्दी झाली होती. सिनेमात सलमानचं गाणं सुरू झालं आणि चाहत्यांचा उत्साह बेकाबू झाला. चाहत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी चक्क थिएटरमध्येच फटाके फोडले. थिएटर मालकानं या प्रकाराची कल्पना पोलिसांनी दिली आणि पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतलं. यात कुणाला दुखापत झाली नाही, हे सुदैवच म्हणायचं.

पण प्रश्न असा उरतो..थिएटरमध्ये अनेक प्रेक्षक असतात, जे शांतपणे सिनेमा पाहत असतात. आपल्या उत्साहापोटी आपण इतरांचाही जीव धोक्यात घालतोय एवढी साधी जाणीव या अतिउत्साही चाहत्यांना कशी होत नाही?

१९९७ मध्ये दिल्लीत उपहार थिएटरमधल्या अग्नितांडवात गुदमरून तब्बल ५९ जणांचा जीव गेला होता. 'बॉर्डर' सिनेमा सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. भारतात थिएटरमधल्या आगीची ही अलिकडच्या काळातही मोठी दुर्घटना..ती समोर असतानाही त्यापासून कोणताही धडा घेतला जात नाही.

Loading...
Loading...

उलट सलमानचे तथाकथित चाहते थिएटरमध्येच बिनदिक्कत फटाके फोडतात आणि आपल्यासोबत इतर अनेकांचा जीव धोक्यात घालतात, हे अनाकलनीय आहे. थिएटर प्रशासनानंच अशा लोकांना पायबंद घालायला हवा. प्रेक्षकांची कसून तपासून करूनच आत सोडावं. नाहीतर भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा आनंदीआनंद असताना आणखी एक उपहार होणार नाही याची हमी कुणीच देऊ शकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 08:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close