Home /News /entertainment /

अरे देवा! आता दीपिका-आलियाचं 'मेल व्हर्जन', तुम्ही पाहिलेत का हे अजब PHOTOS

अरे देवा! आता दीपिका-आलियाचं 'मेल व्हर्जन', तुम्ही पाहिलेत का हे अजब PHOTOS

बॉलिवूड अभिनेत्रींचे मेल लुकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात दीपिका पदुकोणपासून ते श्रद्धा कपूर पर्यंत इतर अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.

    मुंबई, 24 जून : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही मीम्स शेअर होताना दिसत असतात. इथे एका पेक्षा एक जबरदस्त मीम्स तयार करून शेअर केले जातात आणि कधी कधी ते खूप व्हायरल सुद्धा होतात. काही दिवसांपूर्वी मेल क्रिकेटर्सचे फिमेल लुक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. पण आता बॉलिवूड अभिनेत्रींचे मेल व्हर्जन सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात दीपिका पदुकोणपासून ते श्रद्धा कपूर पर्यंत कोणालाही सूट मिळालेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये या अभिनेत्री छोटे केस आणि दाढी-मिशा अशा अवतारात दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायर होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या फोटोंमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींचा मेल लुक वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. काहीचे केस अगदीच छोटे तर काहींना मिलिट्री कट. यात दीपिका पादुकोण सोबतच प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, सोनम कपूर, कंगना रणौत, कृति सेनन, यामी गौतम, दिशा पाटनी, ऐश्वर्या राय, जॅकलीन फर्नांड‍िस, कियारा आडवाणी, श्रद्धा कपूर, प्राची देसाई, तापसी पन्नू, अनन्या पांडे, परिणीति चोपड़ा, भूमि पेडनेकर, उर्वशी रौतेला यांचे मेल व्हर्जन पाहायला मिळत आहेत. या बॉलिवूड अभिनेत्रींना अशा अवतारात पाहिल्यावर कोणालाच हसू आवरणार नाही. गंमतीचा भाग सोडला तर काही असे चाहते सुद्धा आहेत ज्यांना अभिनेत्रींच्या लुकशी केलेली ही छेडछाड अजिबात आवडलेली नाही. त्यामुळे त्यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे. या अगोदर काही काळापूर्वी सेलिब्रेटींच्या म्हातारपणीचे फोटो व्हायरल झाले होते. जे अनेक सेलिब्रेटींनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. या आधी काही दिवसांपूर्वी क्रिकेटर्सचे फिमेल लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात इंडियाच्या सर्व क्रिकेटर्सचं फिमेल व्हर्जन पाहायला मिळलं होतं. हे फोटो युवराज सिंहने त्याच्या सोशल मीडियावरही शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना त्यानं याला एक मजेशीर कॅप्शन सुद्धा दिलं होतं. त्यानं लिहिलं, यापैकी कोण तुम्हाला आपली गर्लफ्रेंड म्हणून आवडेल. यात रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, केएल राहुल, एमएस धोनी, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांचे फोटो होते.
    First published:

    Tags: Aalia bhatt, Bollywood, Deepika padukone

    पुढील बातम्या