मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मनोरंजनसृष्टीला पुन्हा धक्का! प्रसिद्ध लेखकाचं निधन, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

मनोरंजनसृष्टीला पुन्हा धक्का! प्रसिद्ध लेखकाचं निधन, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

लेखक सतीश बाबू पायनूर

लेखक सतीश बाबू पायनूर

गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 25 नोव्हेंबर :  गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन सृष्टीतून निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम लेखक सतीश बाबू पायनूर यांचे निधन झाले आहे. 24 नोव्हेंबर रोजी सतीश बाबू यांचं निधन झालं. लेखकाने 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातनी समोर येताच मल्याळम मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकजण त्यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त करत आहेत.

लेखक सतीश बाबू पायनूर यांचा तिरुअनंतपुरममधील एका फ्लॅटमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला. गुरुवारी पत्नी माहेरी गेल्यानंतर लेखक घरी एकटेच होते. सतीश यांनी कोणाचाही फोन उचलला नाही. दरवाजा वाजवल्यानंतरही घरातून काहीच आवाज आला नाही. त्यामुळे त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच आतले दृश्य पाहून सगळ्यांना धक्काच बसला. सतीश यांचा मृतदेह समोर होता. अद्याप लेखकाच्या मृत्यून कारण स्पष्ट झालेलं नाही.

अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या मृत्यूमध्ये कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही. पोलिसांनी सतीश बाबू पायनूर यांचा मृतदेह तिरुअनंतपुरम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे.

प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार सतीश बाबू यांना 2012 मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. केरळच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत असलेल्या भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मन्नू, दैवापुरा, मांजा सूर्यांते नलुकल आणि कुडामणिकल किलुंगिया रविल यासह अनेक कादंबऱ्यांचे लेखक देखील आहेत, त्यांनी मलायत्तूर पुरस्कार आणि थोपपिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

First published:

Tags: Entertainment