मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Director Ali Akbar quits religion: वसीम रिझवींनंतर 'या' दिग्दर्शकाने सोडला इस्लाम धर्म, वाचा काय आहे कारण

Director Ali Akbar quits religion: वसीम रिझवींनंतर 'या' दिग्दर्शकाने सोडला इस्लाम धर्म, वाचा काय आहे कारण

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अली अकबर यांनी मुस्लिम धर्माचा त्याग (Director Ali Akbar quits religion) केला आहे. दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांची आणि देशाची बदनामी झाल्यामुळे त्यांनी इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे

पुढे वाचा ...

मुंबई, 11 डिसेंबर: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अली अकबर यांनी मुस्लिम धर्माचा त्याग (Director Ali Akbar quits religion) केला आहे. दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat Demise) यांची आणि देशाची बदनामी झाल्यामुळे त्यांनी इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्ये त्यांनी असे वक्तव्य केले होते की, मदरशात राहताना एका 'उस्तादा'ने त्यांचे लैंगिक शोषण केले होते. अली अकबर यांच्याविषयी जाणून घ्या सविस्तर..

58 वर्षीय अकबर यांचा जन्म 1963 साली वायनाड, केरळ याठिकाणी झाला होता. ते व्यवसायाने दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि गीतकार आहेत. ते प्रामुख्याने मल्याळम सिनेमात सक्रीय आहेत. MSIDB च्या माहितीनुसार, अकबर यांनी 1988 मध्ये फिल्म्समधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. याशिवायही ते अनेक चित्रपटांचा भाग होता. IMDB च्या मते, ते ग्रामपंचायत (1998), सीनिअर मँड्रेक (2010) या चित्रपटांसाठी ओळखले जातात.

हे वाचा-कॉटन साडीमध्ये समंथा फ्लाँट करतेय परफेक्ट फिगर, इंटरनेट सेन्सेशन बनली अभिनेत्री

इस्लाम धर्म सोडण्याचे कारण

अकबर यांच्या मते, त्यांचा धर्मावरील विश्वास उडाला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओही त्यांनी बुधवारी फेसबुकवर शेअर केला. अनेक लोकांनी जनरल रावत यांच्या मृत्यूशी संबंधित पोस्टवर इस्लामवादींनी 'स्मायली इमोटिकॉन्स' वापरल्याचा आरोप आहे. या कथित घटनांनंतर अकबर यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचा-महाराष्ट्राचा डिस्कस-थ्रो चॅम्पियन होता CIDफेम ‘दया’, यामुळे वळला अभिनयाकडे

अकबर यांनी असे म्हटले की, 'आज मी जन्मापासून मिळालेला पेहराव फेकून देत आहे. आजपासून मी मुस्लिम नाही, भारतीय आहे. माझे हे उत्तर त्या लोकांसाठी आहे ज्यांनी भारताविरोधात हजारो स्मायलिंग इमोटिकॉन पोस्ट केले आहेत'. अनेक मुस्लिम युजर्सनी त्यांच्या पोस्टला विरोध केला आणि त्याला अपमानास्पद शब्द वापरले आहेत. मात्र, अनेक युजर्सनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. दरम्यान काही वेळाने ही फेसबुक पोस्ट गायब झाली आहे.

First published: