शूटिंगदरम्यान कोसळला अभिनेता, रुग्णालयात जाण्यासाठी मदतही मिळाली नाही; जागीच मृत्यू

एकही वाहन त्यांना मदत करण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात उशीर झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एकही वाहन त्यांना मदत करण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात उशीर झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  • Share this:
    कोची, 14 सप्टेंबर : सेलिब्रिटींच्या निधनाच्या सिनेसृष्टीत शोक पसरला आहे. यातच एका मळ्याळम अभिनेत्याचा वेळीच मदत न मिळाल्यानं मृत्यू झाला. मळ्याळम अभिनेता आणि डबिंग कलाकार प्रबीश चापाकल (Prabeesh Chakkalakkal) केरळच्या कोची येथे एका जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्याचवेळी त्यांना भुरळ आली, आणि ते बेशुद्ध पडले. उपचारादरम्यानच त्यांना वयाच्या 44 वर्षी निधन झाले. द न्यूज मिनिटनं दिलेल्या वृत्तानुसार, प्रबीश हे यूट्यूब चॅनलसाठी शूटिंग करत होते. त्यावेळी त्यांना भूरळ आली. दरम्यान सह कलाकारांनी आणि उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची मदत करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हते. एकही वाहन त्यांना मदत करण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात उशीर झाला. रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाचा-काही दिवसांपूर्वी गायलं होतं शंकर महादेवन यांनी आदित्य पौडवालचं गाणं, म्हणाले... केरळमधील कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी ही टीम जाहिरातीचे शूटिंग करत होती. प्रबीश यांच्या शूटिंगचा काही भाग संपल्यानंतर सेटवरच ते कोसळले. त्याआधी त्यांनी आपल्या सहकार्यांबरोबर एक ग्रुप फोटोही काढला होता. वाचा-सुशांतच्या स्वप्नांसाठी अंकिताने केलं असं काही की तुम्हीही म्हणालं..क्या बात!!! प्रबीश यांनी अलीकडेच कोचीन कोलाज चॅनेलच्या ओणम शोमध्ये महाबलीची भूमिका केली होती. त्यांनी अनेक टेलिफिल्म्समध्ये काम केले आणि डबिंग कलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केले. त्यांनी अॅब्रिड शाईनवर आधारित कुंग फू मास्टर चित्रपटात खलनायिकाच्या व्यक्तिरेखेसाठी डबिंग केले होते. ते जेएसडब्ल्यू सिमेंट्स लिमिटेडचे ​​कर्मचारीही होते.
    Published by:Priyanka Gawde
    First published: