सिनेसृष्टीला मोठा धक्का! शूटिंगला गेला होता अभिनेता; धरणात बुडून झाला मृत्यू

सिनेसृष्टीला मोठा धक्का! शूटिंगला गेला होता अभिनेता; धरणात बुडून झाला मृत्यू

याच वर्षात या अभिनेत्याची शेवटती फिल्म रिलीज झाली होती. आगामी फिल्मची तयारी सुरू होती.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 25 डिसेंबर : मल्याळम अभिनेता अनिल नेदुमंगाड (Anil Nedumangad) यांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्येच एका फिल्मच्या शूटिंगसाठी ते गेले होते. त्या ठिकाणी धरणावर गेले असता धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

अनिल थोडुपुझात (Thodupuzha)  एका फिल्मच्या शूटिंगसाठी आले होते. शुक्रवारी ते  मलांकारा धरणावर (Malankara dam) गेले होते. मित्रांसोबत या धरणाच्या पाण्यात ते अंघोळीसाठी उतरले आणि त्यांचा मृत्यू झाला.

ആദരാഞ്ജലികൾ

Posted by Mammootty on Friday, 25 December 2020

अनिल यांना अय्याप्पनम कोशियम (Ayyappanum Koshiyum), कामाट्टीपदम (Kamattipaadam) आणि पावडा (Paavada) या फिल्मधील अभिनयासाठी ओळखलं जातं. ते टीव्ही अँकरही होते. निर्माते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 2014 साली ते सिल्व्हर स्क्रिनवर झळकले.

हे वाचा - रजनीकांत यांच्या प्रकृतीबद्दल Latest Update; इतक्यात रुग्णालयातून सोडणार नाही

पापम चेय्याथावर कल्लेरियाट्टे (Paapam Cheyyathavar Kalleriyatt) या फिल्ममध्ये ते शेवटचे दिसले होते. याच वर्षात फेब्रुवारीमध्ये ही फिल्म रिलीज झाली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जाते आहे. त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ആദരാഞ്ജലികൾ..

Posted by Suraj Venjaramoodu on Friday, 25 December 2020

दरम्यान मल्याळम चित्रपट सृष्टीला बसलेला हा दुसरा धक्का आहे. गुरुवारी मल्याळम दिग्दर्शक शानवास नारानिपुझा (Shanawas Naranipuzha) यांचं निधन झालं. दिल्लीतील एका स्थानिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्यानंतर त्यांना कोइम्बतूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तब्येत खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप; 'या' महिलेने केला मोठा खुलासा

शानवास नारानिपुझा यांनी आपल्या दिग्दर्शन कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात केली होती. करी या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेली सुफियम सुजातायम (Sufiyum Sujathayum) हr ऑनलाईन ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी कोरोनाच्या काळातील पहिल्या सात चित्रपटांपैकी एक फिल्म. या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली होती.  अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने या चित्रपटात काम केलं होतं. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Published by: Priya Lad
First published: December 25, 2020, 9:46 PM IST
Tags: actor

ताज्या बातम्या