• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'लस घेतानाही जिमचे कपडे घालून आली...', दुसरा डोस घ्यायला आलेली मलायका ट्रोल

'लस घेतानाही जिमचे कपडे घालून आली...', दुसरा डोस घ्यायला आलेली मलायका ट्रोल

मलायका ने काही दिवसांपूर्वीच तिचा लसीचा (Vaccination) पहिला डोस घेतला होता. तर आता काही दिवसांनंतर ती दुसरा डोस घेण्यासाठी पोहोचली होती. पण मलायकाचे कपडे पाहून नेटकरी तिला ट्रोल करू लागले.

 • Share this:
  मुंबई 29 जून : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही निरनिराळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहते. कधी तिच्या स्टाईल साठी तर कधी तिच्या रिलेशनशीपमुळे. तर यावेळी चक्क लस घेतल्यामुळे ती ट्रोल होत आहे. (Malaila Aroara trolled) मलायका ने काही दिवसांपूर्वीच तिचा लसीचा (Vaccination) पहिला डोस घेतला होता. तर आता काही दिवसांनंतर ती दुसरा डोस घेण्यासाठी पोहोचली होती. पण मलायकाचे कपडे पाहून नेटकरी तिला ट्रोल करू लागले.
  मंगळवारी सकाळी मुंबईत मलायका लस घेण्यासाठी एका हॉस्पिटलमध्ये दिसली होती. त्यावेळी तिने जिमचेच (Gym) कपडे परिधान केले होते. त्यामुळे नेटिझन्सनी तिला ट्रोल केलं. (Malaika Arora vaccination)
  अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन म्हणून मलायका ओळखली जाते. तिचे फिटनेस व्हिडिओ (Malaika Arora Fitness video) नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात. तर नेहमीच ती तिच्या फिटनेस सेंटर बाहेर स्पॉट होत असते.

  आई झाल्यानंतर पहिल्यांदाच करीना दिसली पार्टी करताना; मलायका, करिश्मासह झाली स्पॉट

  47 व्या वर्षीही मलायका ने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. यासोबतच ती तिच्या चाहत्यांना ही फिट राहण्यासाठी प्रेरित करते. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. सोशल मीडियावर मलायका फारच सक्रिय असते. मलायका अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबत असलेल्या रिलेशनशिप मुळे फारच चर्चेत राहते. नुकतच अर्जून कपूर चा वाढदिवस होऊन गेला तेव्हा मलायकाने त्याला सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचं नात हे त्यांच्या वयातील अंतरामुळे कायमच चर्चेचा विषय ठरलं आहे.
  Published by:News Digital
  First published: