Home /News /entertainment /

अर्जुन कपूरला डेट करणाऱ्या मलायका अरोराचं मुलीसाठी सुरूए प्लॅनिंग; म्हणते, मला लेकच हवी

अर्जुन कपूरला डेट करणाऱ्या मलायका अरोराचं मुलीसाठी सुरूए प्लॅनिंग; म्हणते, मला लेकच हवी

अभिनेत्री मलायका अरोराला आता मुलीची आई (Malaika arora want baby girl) व्हायची इच्छा पूर्ण करायची आहे.

मुंबई, 25 जून : अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) तिच्या फिटनेस (fitness) आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. स्टायलिश मलायका फिटनसेच्या बाबतीत तरुण वर्गासाठी इन्स्पिरेशन आहे. ती तिचे आणि तिचा मुलगा अरहानसोबतचे फोटो सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करत असते. सध्या मलायका सोनी टीव्हीच्या सुपर डान्सर चॅप्टर 4 (super dancer chapter 4) शोमध्ये जज आहे. या शोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सुपर डान्सरमध्ये अंशिका राजपूत या कंटेस्टेंटचा डान्स मलायकाला खूप आवडला. तिचा डान्स पाहिल्यानंतर मलायकाने आपल्याही एक मुलगी (Malaika arora want baby girl) असावी, अशी इच्छा आधीपासूनच आहे, असं सांगितलं. मलायका म्हणाली की "मला मुलगी असावी, अशी माझी खूप इच्छा होती. याबाबत मी गांभीर्यानं विचार करत आहे. मला एक मुलगा आहे. मात्र मुलगी हवी होती, असं मला कायम वाटतं. माझ्याकडे खूप छान कपड्यांचं , मेकअप आणि शूजचं कलेक्शन आहे. मात्र ते घालायला कोणीच नाही, त्यामुळे मला मुलगी पाहिजे" मलायकाने तिची इच्छा बोलून दाखवल्यानंतर जज गीता कपूर एक्सायटेड झाली आणि तिने मलायकाला शुभेच्छा दिल्या. त्यावर मलायकाने गीता तुझ्या तोंडात घी-शक्कर असं म्हणत. मला एक मुलगी असेल किंवा मी एक मुलगी दत्तक घेईन, ही माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. हे वाचा - ‘मी सिंगल नाही, माझ्यावर लाईन मारू नका’; ट्रोलर्सला अभिनेत्रीची विनंती दरम्यान मलायकाने तिची ही इच्छा पहिल्यांदाच बोलून दाखवलेली नाही. यापूर्वी सुपर डान्सरमध्ये फ्लोरीना गोगोई (Florina Gogoi) नावाच्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा डान्स तिला प्रचंड आवडला होता. यावेळी देखील फ्लोरिडाला उचलून घेत मलायकाने ही खंत व्यक्त केली होती. त्यावेळी ती म्हणाली होती, की मला नेहमी वाटतं की मला एक मुलगी असायला हवी होती. मी तुला घरी नेऊ का? असाही प्रश्न मलायकाने चिमुकल्या फ्लोरीडाला विचारला होता. दरम्यान, या शोमध्ये मलायका अरोराशिवाय गीता कपूर आणि अनुराग बासू दोघे जज आहेत. मलायका फिटनेस फ्रिक असून ती तिच्या चाहत्यांसोबत, योग आणि व्यायामाचे व्हिडिओ शेअर करत असते. कोरोनाच्या या कठीण काळात ती तिच्या फॅन्सना पोषक आहार आणि व्यायामाचे महत्व पटवून सांगताना दिसत आहे. यासह फिटनेस लेव्हल वाढवणारी आसने आणि डाएटबद्दलही माहिती देत असते. हे वाचा - ‘मराठी अभिनेत्रींना किस करणं शोभत का?’ ट्रोलर्सला तेजस्विनीचं जोरदार प्रत्युत्तर 47 वर्षीय मलायका पती अरबाझ खानपासून विभक्त झाली असून सध्या अभिनेता अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जून कपूर आणि मलायका दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून नात्याची कबुली दिली आहे.
First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood, Entertainment, Malaika arora

पुढील बातम्या