मुंबई 23 मे: मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मादक अदा आणि डान्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना घायाळ करणारी मलायका गेल्या काही काळात आपल्या खासगी आयुष्यामुळं अधिक चर्चेत राहु लागली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओज सतत सोशल मीडियावर चर्चेत असतात. यावेळी देखील तिचा असाच एक अचंबित करणारा व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. (Malaika Arora Video Viral) मात्र हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी तिच्या वयाची खिल्ली उडवत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा नेहमीप्रमाणेच आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघाली आहे. तेवढ्यात तिला एक वृद्ध व्यक्ती थांबवतो आणि तिची स्तुती करु लागतो. तू खुप फिट अँड फाईन आहेस. तुझे व्हिडीओ पाहून आम्हाला फिटनेसची प्रेरणा मिळते. अशीच तंदुरुस्त राहा इश्वर सदा तुझ्यासोबत आहे. अशी प्रसंशा त्या व्यक्तीनं केली. मलायकानं देखील अगदी विनम्र होत त्याचे आभार मानले व तिनं त्या व्यक्तीला निरोप दिला.
जनहित में जारी... नुसरत भरुचा मेडिकल स्टोअर्समध्ये विकणार कंडोम
View this post on Instagram
खरं तर हा व्हिडीओ खूपच सकारात्मक पद्धतीचा आहे. मात्र काही नेटकरी यावरुन मलायकाची खिल्ली उडवत आहेत. या माणसाचे इशारे संशयास्पद आहेत. पाहा शाळेतील दोन मित्र खूप वर्षांनी भेटले. पाहा मित्र वृद्ध झाला आणि मैत्रीण तरुणच राहिली अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या जात आहेत. या व्हिडीओला काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Malaika arora, Video viral