लहान मुलांसोबत अशी वागली मलायका, VIDEO पाहून भडकले नेटकरी

लहान मुलांसोबत अशी वागली मलायका, VIDEO पाहून भडकले नेटकरी

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधील लहान मुलासोबतचं मलायकाचं वर्तन पाहून नेटकरी तिच्यावर भडकले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : कधी बोल्ड लुक तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. मलायकाला ट्रोल करण्याचं एकही कारण ते सोडत नाहीत. आताही काहीसं असंच झालं आहे. ज्यामुळे मलायका पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. सध्या मलायकाचा लहान मुलांसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधील लहान मुलासोबतचं मलायकाचं वर्तन पाहून सर्वजण तिच्यावर भडकले आहेत.

मलायकाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मलायका काही लहान मुलांसोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. पण जसा फोटो काढून होतो तशी मलायका त्या मुलांना न भेटता किंवा त्यांच्याशी न बोलताच तिथून लगेच निघून जाते. मलायाकाचं हे वर्तन नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही. त्यांनी तिचं हे वर्तन खोट असल्याचं म्हणत तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. वांद्रे येथील एका रेस्टॉरंटच्या बाहेरील हा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअ केला आहे.

83 Video- रणवीरसोबत प्रॅक्टिस करताना लेकानेच मोडली संदीप पाटील यांची बॅट

 

View this post on Instagram

 

#malaikaarora with fan's snapped at sequel today in bandra #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मलायकाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं खूपच वाईट वागणं आहे, फक्त फोटोग्राफर्ससाठी हसून पोज दिली आहे. समजत नाही अशा अभिनेत्रीला लोक जास्त महत्त्व का देतात. तर दुसऱ्या का युजरनं लिहिलं, फोटो काढून होताच मलायका पळू गेली. आणखी एकानं म्हटलं, फक्त फोटोग्राफर्ससाठी हसत आहे, नंतर मुलांकडे वळूनही पाहिलं नाही. किती स्वार्थी आहे ही.

'या' सहा अभिनेत्री ज्यांचे सेक्स सीन झाले होते लीक

काही दिवसांपूर्वी मलायाका तोकड्या जिम शॉर्ट्समुळे ट्रोल झाली होती. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतच्या न्यूयॉर्क व्हेकेशनमुळे सुद्धा चर्चेत होती. एकत्र व्हेकेशनला गेलेलं हे कपल अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसले होते. यानंतर भारतात परतल्यावर मलायकानं अर्जुनसोबतचं नातं एका मुलाखातीत कबुल केलं होतं. त्यासोबतच त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांनाही तिनं सडेतोड उत्तर दिलं होतं.

Kulbhushan Jadhav यांच्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं वादग्रस्त ट्वीट

================================================================

VIDEO: मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड; पुलालगतचा रस्ता गेला वाहून

First published: July 19, 2019, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading