Home /News /entertainment /

बॉयफ्रेंड अर्जूनसोबत ऑनस्क्रीन झळकणार मलायका; मिळालं कोट्यवधींचं मानधन

बॉयफ्रेंड अर्जूनसोबत ऑनस्क्रीन झळकणार मलायका; मिळालं कोट्यवधींचं मानधन

डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या एका कूक शोसाठी मलायला आणि अर्जूनला विचारण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोसाठी दोघांनी होकार दिला आहे.

    मुंबई 27 मार्च: बॉलिवूडचे लव्ह बर्ड्स अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपलं प्रेम मुक्तपणे व्यक्त करताना दिसतात. जेव्हापासून त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं तेव्हापासून जवळपास प्रत्येक कार्यक्रमात या जोडीला एकत्र पाहिलं जातंय. या पार्श्वभूमीवर मलायका आणि आर्जून रुपेरी पडद्यावर एकत्र कधी झळकणार अशी वाट प्रेक्षक पाहात होते. मात्र चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.  येत्या काळात हे कलाकार एका कुकरी शोमध्ये एकत्र अँकरिंग करताना दिसणार आहेत. (Malaika Arora tv show with Arjun Kapoor ) डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित केल्या जाणाऱ्या एका कूक शोसाठी मलायला आणि अर्जूनला विचारण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शोसाठी दोघांनी होकार दिला आहे. या शोमध्ये सेलिब्रिटी जोड्या विविध प्रकारचे पदार्थ तयार करताना दिसतील. शिवाय आपल्या आयुष्यातील काही गंमतीशीर प्रसंग देखील सांगतील. हा शो म्हणजे एक प्रकारे मुलाखतीचाच कार्यक्रम असेल. परंतु ही मुलाखत पदार्थ तयार करत असताना घेतली जाईल. अवश्य पाहा - ‘ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकतो ती सुपरस्टार होते’; आमिर खानचा अजब दावा डिक्सव्हरीनं या शोची अद्याप अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. सध्या या शोच्या पटकथेवर काम सुरु आहे. मात्र या कुकरी शोसाठी अर्जून आणि मलायकाला कोट्यवधींचं मानधन देण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मलायका यापूर्वी अनेक रिअलिटी शोमध्ये झळकली आहे. परंतु अर्जून या कुकरी शोच्या निमित्तानं छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Arjun kapoor, Bollywood, Entertainment, Malaika arora, Marathi entertainment

    पुढील बातम्या