मुंबई, 30 मे : बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबच असलेल्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. लवकरच मलायक आणि अर्जुन लग्नाच्या बेडीत अडकतील अशा चर्चा मागच्या काही काळापासून सुरू होत्या मात्र नुकतच अर्जुननं एवढ्या लवकर लग्नाचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्यानंतर आता मलायकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या फोटोमध्ये असं काही दिसत आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काहींना मलाकाचं असा फोटो शेअर करणं आवडलेलं नाही तर काहींनी मात्र तिच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.
मलायकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो मलायकानं तिच्या लॅपटॉपवर वॉलपेपर म्हणून लावला आहे आणि या वॉलपेपरचा फोटो काढून मलायकानं तो सोशल मीडियावर शेअर केला. पण हा फोटो सध्या सोशल मीडियावर वादाचं कारण बनला आहे. या वादाचं कारण म्हणजे या फोटोमध्ये मलायकाचं आर्मपीट फ्लॉन्ट करणं. या फोटोमध्ये बाकीच्या अभिनेत्रींप्रमाणे मलायकानं तिचे आर्मपीट एडिट केलेले नाही तर नॅचरल ठेवले आहे.
सोशल मीडियावर वादाचं कारण बनलेल्या या फोटोचं मलायकाचे अनेक चाहते कौतुक करत आहेत पण काहींना मात्र मलायकाचं अशाप्रकारे आर्मपीट फ्लॉन्ट करणं आवडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी तिला यावरून यासंबंधी ज्ञान द्यायला सुरुवात केली आहे. तर काहींनी तिच्यावर टीकाही केली आहे. मलायका वॅक्स करायचं विसरून गेल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर काही मात्र यासाठी मलायकाला आपली प्रेरणा मानत आहेत. जर पुरुष शेव्ह न करता फोटो शेअर करु शकतात तर मग महिला का नाही असं काहींच म्हणणं आहे.
मलायकानं या फोटोला कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. पण तिनं यात हॅशटॅग bts वापरला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अशाप्रकारचा फोटो शेअर केल्यानंतर वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदर अभिनेत्री प्रियांका चोप्राही आर्मपीट फ्लॉन्टिंगमुळे ट्रोल झाली होती. तिनं एका मॅग्झीनसाठी हे फोटोशूट केलं होतं. ज्यात तिच्या एडिटेड आर्मपीटवर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण नंतर तिनं एडिट न केलेला फोटो शेअर केल्यानं ती ट्रोल झाली होती.
View this post on Instagram
My new cover! Thank you @maxim.india #pctopsmaximhot100 #maximhot100 @stephaniebbmakeup @tedgibson