फक्त शर्ट घालून बाहेर पडली मलायका अरोरा, युजर्सनी विचारलं...

फक्त शर्ट घालून बाहेर पडली मलायका अरोरा, युजर्सनी विचारलं...

मलायका अरोरा कधी अर्जुन कपूरसोबतचं नातं तर कधी बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये बोल्ड लुक आणि धमाकेदार डान्समुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री मलायका अरोरा काही ना काही कारणानं नेहमीच चर्चेत असते. कधी अर्जुन कपूरसोबतचं नातं तर कधी बोल्ड फोटोशूट. पण सध्या मलायकाच्या नावाची चर्चा होतेय तिच्या रिव्हिलिंग ड्रेसमुळे. मलायका अनेकदा बोल्ड अवातारात दिसते पण यावेळी तिनं जो शर्ट ड्रेस घालून आउटिंगसाठी निघाली त्यामुळे मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मलायकाच्या या फोटोवर नकारात्मक कमेंट पाहायला मिळत आहेत.

मलायका अरोराचे हे फोटो मानव मंगलानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. मलायका संडे डिनरनंतर तिच्या बहिणीच्या घराबाहेर स्पॉट झाली त्यावेळी तिनं व्हाइट कलरचा शर्ट ड्रेस घातला होता. या ड्रेसवर तिनं हाय शूज घातले होते तर डोक्यावर हॅट घेतली होती. पण मलायकाचा हा लुक चाहत्यांचा मात्र पसंतीत उतरला नाही आणि आता यावरुनच मलायकाला ट्रोल केलं जात आहे.

TMC खासदार नुसरत जहाँच्या प्रकृतीत सुधारणा, ड्रग्जचा ओव्हरडोस?

 

View this post on Instagram

 

#MalaikaArora snapped post dinner at #amritaarora house today #sunday #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

एका युजरनं लिहिलं, ही नेहमी पॅन्ट घालायला का विसरते. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, मलायकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तिचं वाढतं वय लक्षात येतं. याशिवाय आणखी एका युजरनं लिहिलं, मलायकाचे पहिले आणि आत्ताचे फोटो पाहिल्यावर लक्षात येत की तिच्यात किती बदल झाला आहे. तर एका युजरनं तर चक्क तिला वयाचा विचार करुनच कपडे घालत जा असा सल्ला दिला आहे. पण काहींनी मात्र मलायकाच्या फॅशन सेन्सचं कौतुक केलं आहे.

सलमान, शाहरुख आणि आलियासह बॉलिवूड कलाकार एकाच थाळीत...

 

View this post on Instagram

 

Holy guacamole ..... #sistaact ♥️ #fitnfabaward @amuaroraofficial#bestfootforward

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

काही दिवसांपूर्वी मलायकानं रेड ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट केल होतं. यावेळी ती तिची बहिण अमृता अरोरासोबत दिसली होती. तिच्या या लुकचं अनेकांनी कौतुकही केलं होतं. मलायकाच्या खासगी जीवनाबद्दल बोलायचं तर तिनं तिच्या 46 व्या वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर अर्जुन कपूरसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर झालेल्या प्रत्येक मुलाखतीत हे दोघंही एकमेकांबद्दल दिलखुलासपणे बोलताना दिसले आहेत.

अभिनेत्री शमा सिकंदरचा BOLD अवतार, व्हायरल झाले PHOTOS

=======================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2019 01:27 PM IST

ताज्या बातम्या