Home /News /entertainment /

अरबाजसोबत घटस्फोटानंतर प्रचंड तणावात होती मलायका अरोरा, खुलासा करत म्हणाली...

अरबाजसोबत घटस्फोटानंतर प्रचंड तणावात होती मलायका अरोरा, खुलासा करत म्हणाली...

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायकाच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल आयुष्याचीही सतत चर्चा होत असते.

    मुंबई, 26 जानेवारी-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री मलायका अरोरा   (Malaika Arora)   नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायकाच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल आयुष्याचीही सतत चर्चा होत असते. अभिनेत्री सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असली. तरी ती कधीकाळी अरबाज खानची   (Arbaaz Khan)  पत्नी होती. या दोघांनी अनेक वर्षांचा संसार मोडत घटस्फोट घेतला होता. या दुःखातून अभिनेत्रीने स्वतःला कसं सावरलं हे आज आपण पाहणार आहोत. अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. ती अनेकांना आपल्या स्टाईल आणि फिटनेसने घायाळ करत असते. नेहमीच बिनधास्त आणि बोल्ड राहणारी मलायका एकेकाळी मोठ्या दुःखातून सावरली आहे. मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानसोबत 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांनी अनेक वर्षे सुरळीत संसार केला होता. परंतु 2017 मध्ये अचानक त्यांनी घटस्फोट घेत सर्वांनाच धक्का दिला होता. मलायकाने आपल्या घटस्फोटाबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता. यावेळी तिनं आपल्या मनाची अवस्था जाहीर केली होती. या मुलाखतीमध्ये मलायकाने सांगितलं होतं की, घटस्फोट घ्यायच्या आधी माझ्या मनात अनेक प्रश्न घोंघावत होते. कारण आमच्या या निर्णयाचा परिणाम फक्त आमच्या दोन्ही कुटुंबावरच नेव्हर तर आमचा मुलगा अरहानवरसुद्धा पडणार होता. मलायका आणि अरबाज खानला अरहान हा मुलगा आहे. त्यामुळे घटस्फोटाचा परिणाम त्याच्यावर कसा होईल अशी अभिनेत्रीला चिंता होती. तसेच मलायकाला भविष्यात आपण पुन्हा काम करू शकेन का? याबद्दल शंका होती. अभिनेत्री मलायका अरोरा घटस्फोटामुळे प्रचंड तणावात होती. या सर्व परिस्थिती अभिनेत्रीने स्वतः ला कसं सावरलं याबद्दल सांगताना ती म्हणाली, 'या सर्व तणावात मी स्वतः ला सकारात्मक आणि शांत ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करत होते'. मी या गोष्टींचा अवलंब करून स्वतः ला तणापासून मुक्त दूर ठेवलं होतं.आपला घटस्फोट हा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. आज मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तर दुसरी अरबाज खान मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Malaika arora

    पुढील बातम्या