मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मलायका अरोरा लोकांच्या गर्दीत अडकताच अर्जुनने केलं असं काही..., एयरपोर्टवरील VIDEO VIRAL

मलायका अरोरा लोकांच्या गर्दीत अडकताच अर्जुनने केलं असं काही..., एयरपोर्टवरील VIDEO VIRAL

बॉलिवूड  (Bollywood)  लव्हबर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Arjun Kapoor & Malaika Arora) नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात.नुकतंच हे जोडपं मुंबई एयरपोर्टवर दिसून आलं. ते आपल्या पॅरिस ट्रिपवरुन (Paris Trip) परत आले आहेत

मुंबई, 30 जून-  बॉलिवूड  (Bollywood)  लव्हबर्ड्स अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Arjun Kapoor & Malaika Arora) नेहमीच आपल्या नात्यामुळे चर्चेत असतात.नुकतंच हे जोडपं मुंबई एयरपोर्टवर दिसून आलं. ते आपल्या पॅरिस ट्रिपवरुन (Paris Trip) परत आले आहेत. यावेळी एयरपोर्टवर अर्जुन लोकांच्या घोळक्यापासून मलायकाचं प्रोटेक्शन करताना दिसून आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता अर्जुन कपूरने नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने अर्जुन आणि मलायका पॅरिसला गेले होते. या दोघांनी पॅरिसमध्ये वाढदिवस सेलिब्रेट केला. पॅरिसमध्ये दोघांनी बरीच धम्माल केली आहे. या दोघांनी आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये अर्जुन आणि मलायकाचा रोमँटिक अंदाजसुद्धा दिसून आला होता.

त्यांनतर आता हे दोघेही पॅरिस व्हेकेशनवरुन मुंबईत परतले आहेत. मुंबईमध्ये येताच एयरपोर्टवर या दोघांना चाहत्यांच्या घोळक्याने घेरलं. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत सेल्फीसुद्धा काढल्या. नंतर मात्र मलायकाला प्रोटेक्ट करत अर्जुन घोळक्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. आणि मलायकाला पुढे घेऊन जातो. हा व्हिडीओ प्रसिद्ध सेलेब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे.

(हे वाचा:अथिया शेट्टीने बॉयफ्रेंड KL Rahul वर केला प्रेमाचा वर्षाव; शस्त्रक्रियेनंतर शेअर केला फोटो )

अर्जुन आणि मलायका बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये 'इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या' स्क्रिनिंगमध्ये एकत्र येत या जोडप्याने आपलं नातं अधिकृत केलं होतं. हे दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात.तसेच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood News, Entertainment, Malaika arora