मुलगा अरहानसोबत बोल्ड कपड्यात फिरताना दिसल्यानं मलायका पुन्हा झाली ट्रोल

मुलगा अरहानसोबत बोल्ड कपड्यात फिरताना दिसल्यानं मलायका पुन्हा झाली ट्रोल

यावेळी ती नेहमीप्रमाणेच तिच्या स्टायलिश अंदाजात दिसली.

  • Share this:

मुंबई, 18 जून : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. मागच्या नेक दिवसांपासून या दोघांच्याही लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अर्जुन आणि मलायकानं या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं. आम्ही सध्या लग्न करण्याचा विचारात नाही पण जेव्हाही लग्न करू त्यावेळी कोणापासूनही ते लपवणार नाही असं एक मुलाखातीत अर्जुननं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता मलायका तिचा 16 वर्षीय मुलगा अरहान खान सोबत फिरताना दिसली.

मलायका अरोरा नुकतीच तिचा मुलगा अरहान खान सोबत एका हॉटेलच्या बाहेर कॅमेरात कैद झाली. यावेळी ती नेहमीप्रमाणेच तिच्या स्टायलिश अंदाजात दिसली. मलायकानं व्हायइट कलरचा स्ट्रॅप ड्रेस यावेळी घातला होता. पण तिचा हा लुक मात्र तिच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरला नाही. एरवी तिच्या स्टायलिश अंदाजाचे दिवाने असलेल्या तिच्या चाहत्यांनी यावेळी मात्र तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काहीनी तिला अर्जुनचं नाव घेत ट्रोल करायला सुरुवात केली तर काहींनी तिला मुलासोबत फिरायला जाताना व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला.

मलायकानं अशाप्रकारे कपड्यांवरून ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही कधी ड्रेस तर कधी हॉट फोटोशूटमुळे मलायकाला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगचा मलायकावर फारसा परिणाम दिसून येत नाही. तसेच अर्जुन आणि तिच्या वयातील अंतरामुळेही तिला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अर्जुननं एका मुलाखती दरम्यान मलायकासोबतच्या नात्याचा जाहीर कबुली दिली होती. त्यासोबतच अद्याप लग्नाचा कोणताही विचार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतं. पण त्यानंतर बहीण अंशुला कपूरमुळे अर्जुन लग्नाचा विचार लांबणीवर टाकत असल्याचंही म्हटलं गेलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading