मलायका अरोरानं शेअर केला सेल्फ आयसोलेशनचा PHOTO, म्हणाली; हा आठवडा गेला पण...

मलायका अरोरानं शेअर केला सेल्फ आयसोलेशनचा PHOTO, म्हणाली; हा आठवडा गेला पण...

मलायकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोरोना व्हायरसमुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटींप्रमाणे मलायका सुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. मलायका नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी मलायकानं नो मेकअप फोटो शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. आताही तिनं असाच एक फोटो शेअर केला जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खास करुन या फोटोचं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मलायकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं ब्लॅक आऊटफिट्स घातले असून या फोटोमध्येही तिचा नो मेकअप लुक पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना तिनं लिहिलं, 'हा आठवडा सुद्धा निघून गेला... मी विचार करतेय आम्हाला नक्की काय रोखत आहे. पण या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या त्वचेवर सूर्याचा प्रकाश, केसांमध्ये खेळणारी हवा, माझ्या डोक्यावर छत आहे आणि माझ्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती माझ्या जवळ आहे.'

'महाभारत'च्या स्टारकास्ट मिळायचं एवढं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही

मलायकाच्या या फोटोवर अनेकांना कमेंट केल्या आहेत. तिचा हा फोटो चाहत्यांच्या पंसतीस उतरताना दिसत आहे. तसं पाहायलं गेलं तर सोशल मीडियावर मलायकाचा एखादा फोटो व्हायरल होण्याची ही पहिलच वेळ नाही. याआधीही तिच्या बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. याशिवाय ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते.

VIDEO : 'चलती है क्या 9 से 12' वर सलमान जॅकलिनला डान्स स्टेप शिकवतो तेव्हा...

 

View this post on Instagram

 

Missing -my-family-friends-face #stayhome#staysafe

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

काही दिवसांपूर्वी एका लाइव्ह चॅटमध्ये अर्जुनला मलायकाशी लग्न करण्याच्या प्लानविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, जर लग्न केलं तर आम्ही दोघंही कोणापासून लपवणार नाही. मात्र सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार आम्ही केलेला नाही. सध्या आम्ही दोघंही आमच्या कामावर लक्ष देत आहोत असं अर्जुन म्हणाला होता.

'फक्त यासाठी करिश्माने माझ्याशी लग्न केलं' - संजय कपूरचा धक्कादायक आरोप

First published: April 25, 2020, 3:14 PM IST

ताज्या बातम्या