लॉकडाऊनमध्ये अशी झाली आहे मलायकाची अवस्था, Photo शेअर करून म्हणाली...

लॉकडाऊनमध्ये अशी झाली आहे मलायकाची अवस्था, Photo शेअर करून म्हणाली...

मलायकानं नुकताच शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 9 मे : कोरोना व्हायरसनं सध्या देशभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी राहत लॉकडाऊनचं काटेकोर पालन करताना दिसत आहेत. बरेच सेलिब्रेटी सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. यापैकीच एक म्हणजे मलायका अरोरा. मलायका सध्या घरी राहून लॉकडाऊनचं पालन करत आहे. दरम्यान सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

कोरोना व्हायरसमुळे सेल्फ क्वारंटाइन असलेली मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. असाच एक फोटो तिनं नुकताच शेअर केला आहे जो खूप व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका धम्माल करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना मलायकानं लिहिलं, या लॉकडाऊनमध्ये मी माझं मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करत आहे. हा फोटोमध्ये मलायका खळखळून हसताना दिसत आहे. अर्थात सेल्फ क्वारंटाइनमध्ये अनेकदा नकारात्मक विचार येत असतात. अशात मलायका सुद्धा स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत आहे.

View this post on Instagram

Find ur sanity in these insane times .....#stayhomestaysafe

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाचा हा फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केलेल्या पहायला मिळत आहेत. अभिनेत्री सोफी चौधरीनं या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, माझी सुंदर शेजारी. याशिवाय मलायकानं काही दिवसांपूर्वी आपल्या फॅमिलाचा फोटो शेअर करत तिला या सर्वांची खूप आठवण येत असल्याचं म्हटलं होतं. तिचा हा फोटो सुद्धा खूप व्हायरल झाला होता.

View this post on Instagram

50 days n counting .... miss u guys ♥️♥️♥️

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका मागच्या काही काळापासून अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत राहिली आहे. मागच्याच या दोघांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्या नंतर त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं होतं मात्र या दोघांनी यावर कोणतीही कमेंट केली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दोघांनीही त्यांच्या लग्नाचं वृत्त फेटाळलं होतं. सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

First published: May 9, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या