मुंबई, 2 जून : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र याशिवाय अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे सुद्धा ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. आताही काहीसं असंच झालं आहे. मलायकानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही मजेदार फोटो शेअर केले आहेत जे पाहिल्यावर सर्वांनाच अर्जुन कपूरची आठवण झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनं वेगवेगळ्या फनी पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर सध्या चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. पण काही युजरनी मात्र अर्जुनच्या नावाने या फोटोंवरुन मलायकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
मलायकानं सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना लिहिलं, माझ्या लॉकडाऊनचे वेगवेगळे प्रकार. मलायकाच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, अर्जुन कपूर कुठे आहे ? या युजरला रिप्लाय देताना आणखी एक युजरनं बाथरुममध्ये अशी कमेंट करत मलायकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे अर्जुनमुळे ट्रोल होण्याची मलायकाची ही पहिलीच वेळ नाही याआधीही अनेकदा तिला अर्जुन आणि तिच्या वयातील अंतरामुळे ट्रोल करण्यात आलं आहे.
अरबाजपासून वेगळं झाल्यानंतर मलायकाचं नाव अर्जुनशी जोडलं जाऊ लागलं होतं. पण त्यांनी या नात्याला सर्वांसमोर कबुल केलं नव्हतं. पण मागच्या वर्षी त्यांनी या नात्याची कबुली दिली. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र या दोघांनीही एवढ्या लवकर लग्न करण्यास नकार दिला आहे. सध्या आम्हाला आमच्या नात्यासाठी वेळ द्यायचा आहे असं एक मुलखातीत अर्जुननं सांगितलं होतं.
'आता मी अभिनेत्री नाही...' टोळधाड वादावर झायरानं सोडलं मौन, दिलं सडेतोड उत्तर
बडा धमाका! एकताविरोधात हिंदुस्तानी भाऊची पोलिसात तक्रार; वाचा काय आहे प्रकरण