Elec-widget

मलायका अरोराचा हा व्हिडीओ पाहून युझर्स म्हणाले, ‘मुलं खाणाऱ्या या स्त्रीने, अर्जुनलाही खाऊन टाकलं’

मलायका अरोराचा हा व्हिडीओ पाहून युझर्स म्हणाले, ‘मुलं खाणाऱ्या या स्त्रीने, अर्जुनलाही खाऊन टाकलं’

एका युझरने लिहिले की, ‘अर्जुन तू चांगलाच खेळलास..’ तर अजून एका युझरने लिहिले की, ‘अर्जुन कुठेय तो तुझ्या टीमचा भाग नाहीये का?’

  • Share this:

मुंबई, ०८ एप्रिल- मलायका अरोरा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सध्या ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. हे दोघं कधी लग्न करणार याचीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. एकीकडे दोघांचे फोटो काही मिनिटांत व्हायरल होतात तर दुसरीकडे त्यांना ट्रोलही केलं जातं. नुकताच मलायकाने एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मलायका आणि अर्जुनची थट्टा उडवण्यात येत आहे.


व्हिडीओमध्ये मलायका तिच्या ‘दिल से’ सिनेमातील ‘छैया छैया’ गाण्यावर ताल धरताना दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना मलायकाने लिहिले की, ‘जागतील स्वास्थ्य दिनाच्या निमित्ताने माझ्या संपूर्ण टीमने छैया छैया गाण्यावर नाचत धमाल केली.’ यावेळी पोनी टेल बांधलेल्या मलायकाने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी आपली मतं कमेन्ट बॉक्समध्ये लिहायला सुरुवात केली.Loading...

एका युझरने लिहिले की, ‘अर्जुन तू चांगलाच खेळलास..’ तर अजून एका युझरने लिहिले की, ‘अर्जुन कुठेय तो तुझ्या टीमचा भाग नाहीये का?’ तर एकाने पैशांसाठी अर्जुनशी नातं जोडल्याचा आरोप मलायकावर केला.


सलमानच्या कुटुंबाने मलायकाला त्याच्या कुटुंबातून पूर्ण वेगळं केलं आहे. तर आता मलायकाल कोणं कसं सपोर्ट करू शकतं? असा प्रश्नही एकाने कमेंटमध्ये विचारला. तर दुसऱ्या एका युझरने थेट विचारलं की, ‘दीदी तुझा लहान मुलगा अर्जुन कुठे आहे?’ हे कमी की काय एकाने मुलांना खाणारी या स्त्रीने आता अर्जुलाही खाललं अशी कमेंट केली.

गेल्या आठवड्यात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय करायला गेले होते असं म्हटलं जातं.मलायकाच्या फोटोवर कमेंट करत दिग्दर्शक फराह खानने प्रश्न विचारला होता की, तुझे हे फोटो कोण काढतं. फराहच्या या प्रश्नाचं उत्तर देत युझरने अर्जुनचं नाव लिहिलं होतं. स्वतः फराहला या प्रश्नाचं उत्तर अर्जुनच्या फोटोमध्ये मिळालं. कारण काही दिवसांनी अर्जुननेही त्याचा मालदिवचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

काश्मिरी युवक आणि जवानांमध्ये तणाव, थेट घटनास्थळावरील VIDEO आला समोर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 09:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...