मलायका अरोराला तिच्या आयुष्यात हवी होती 'ही' व्यक्ती; व्यक्त केली आपली खंत

मलायका अरोराला तिच्या आयुष्यात हवी होती 'ही' व्यक्ती; व्यक्त केली आपली खंत

मलायका अरोराने (Malaika Arora) आपली इच्छा सर्वांसमोर व्यक्त करून दाखवली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 मे : अभिनेत्री मलायका अरोरा (Actress Malaika Arora) तिच्या फिटनेस (fitness) आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. स्टायलिश मलायका फिटनसेच्या बाबतीत तरुण वर्गासाठी इन्स्पिरेशन आहे. ती तिचे मुलगा अरहानसोबतचे फोटो सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर करत असते. नुकतीच मलायका सोनी टीव्हीच्या सुपर डान्सर (super dancer) शोमध्ये जज म्हणून गेली. यावेळी तिने आपली एक खंत व्यक्त केली.

या डान्स शोमध्ये मलायकाला फ्लोरीना गोगोई (Florina Gogoi) नावाच्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा डान्स प्रचंड आवडला. तिला उचलून घेत मलायकाने एक खंत व्यक्त केली.

मलायकाला पती अरबाझ खानपासून (Arbaaz Khan) मुलगा असून त्याचं नाव अरहान आहे.  मलायका म्हणाली, मला एक मुलगा आहे. मात्र, मुलगी हवी होती,  असं मला कायम वाटतं. माझ्याकडे खूप छान कपड्यांचं आणि शूजचं कलेक्शन आहे. मात्र, ते घालायला कोणीच नाही, असं म्हणत मलायकानं फ्लोरीनाला मिठी मारली. मी तुला घरी नेऊ का? असाही प्रश्न मलायकाने चिमुकल्या फ्लोरीनाला विचारला.

हे वाचा - या अभिनेत्रीला प्रेमविवाह करणं पडलं महागात; काही वर्षांतच झाला घटस्फोट

या भागात फ्लोरीनाने 1980 मध्ये आलेल्या डिस्को स्टेशन या गाण्यावर डान्स केला. हे गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले  (Asha Bhosle ) यांनी गायलं आहे. फ्लोरीना डान्स करत असताना मलायका देखील स्टेजवर आली आणि तिनेही डान्स केला. सुपर डान्सरचा सध्या चौथा सिझन सुरू असून मलायकाने जज शिल्पा शेट्टीला रिप्लेस केल्याची माहिती आहे. मुंबईत लॉकडाऊन असल्यानं शोचं शूटिंग सध्या दमणमध्ये होत आहे. या शोमध्ये मलायका अरोराशिवाय गीता कपूर आणि अनुराग बासू दोघे जज आहेत. मलायका अरोरा नुकतीच Star Vs Food  या सेलिब्रिटी कुकींग शोमध्ये दिसली होती. यावेळी तिने मालाबार फिश करी (Malabar fish curry) बनवली होती.

मलायका फिटनेस फ्रिक असून ती तिच्या चाहत्यांसोबत, योग आणि व्यायामाचे व्हिडिओ शेअर करत असते. कोरोनाच्या या कठीण काळात ती तिच्या फॅन्सना पोषक आहार आणि व्यायामाचं महत्त्व पटवून सांगताना दिसत आहे. यासह फिटनेस लेव्हल वाढवणारी आसने आणि डाएटबद्दलही माहिती देत असते.

हे वाचा - शिल्पा शेट्टीच्या 1 वर्षांच्या मुलीला झाली कोरोनाची लागण

47 वर्षांची मलायका पती अरबाझ खानपासून विभक्त झाली असून सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुन कपूर आणि मलायका दोघांनीही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून नात्याची कबुली दिली आहे.

Published by: Priya Lad
First published: May 7, 2021, 10:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या