मुंबई, 24 सप्टेंबर: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडमधील सेलेब्रिटी कपल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही काळापासून दोघेजण रिलेशनशिपमध्ये (Arjun Kapoor Malaika Arora Relationship) असून ते एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा दिसतात. तसेच आपल्या प्रेमाबद्दल ते सोशल मीडियातून खुलेपणाने बोलत असतात. सध्या मलायकाचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अर्जुन कपूर आणि तिच्या आवडींबद्दल बोलत आहे. याची चर्चा सगळीकडे होत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा एमटीव्हीवरील 'सुपरमॉडेल ऑफ द इयर सीझन 2' या शोमध्ये दिसणार आहे. सोमण हा शो होस्ट करत आहे. मलायकाचा हा व्हायरल व्हिडिओ एम टीव्हीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मिलिंद तिला कसा मुलगा आवडतो किंवा आयडियल मॅन कसा असावा, असा प्रश्न विचारतो. यावर मलायकानं उत्तर देते की, 'मला रफ आणि टफ मुलं आवडतात. जी चांगल्या पद्धतीने फ्लर्ट करतात व जे उत्तम किस करू शकतात आणि हो मला सुंदर मुलं आवडत नाहीत, असं देखील मलासकाने सांगितलं आहे.
मलायकाने या शोदरम्यान मिलिंद सोमणला असंही सांगितलं की, अर्जुन कपूर सर्वोत्तम किसर आहे. मिलिंदने मलायकाला पुढे विचारलं की, तिने अर्जुन कपूरला पाठवलेला शेवटचा मॅसेज कोणता होता? यावर मलायका अरोरा लाजत म्हणाली, ‘आय लव्ह यू 2.’ मिलिंदने पुन्हा विचारले तुला कोण चांगले ओळखते? यावर मलायकाने अर्जुन कपूरचे नाव घेतले.
Well, now you know what kinda men Malaika likes 😏😏
Watch #Livon #MTVSupermodelOfTheYear Season 2 Co-Powered by @OlayIndia Retinol, @VanesaBodyDeo, #MagicMomentsMusicStudio @M2magicmoments & Fashion Partner FNGR tomorrow, 7 PM only on MTV India. pic.twitter.com/HSDKUzvaHl — MTV India (@MTVIndia) September 18, 2021
सेलिब्रिटी क्रशच्या प्रश्नावर मलायकाने डॅनियल क्रेगचे नाव घेतले. जेम्स बाँड मालिकेत डॅनियल बॉण्डची भूमिका साकारत आहे.तर महिला क्रश म्हणून बेला हदीद आवडत असल्याचंही ती देखी सांगितलं. अनेकवेळा मलायकाला तिच्या कपड्यावरून तर कधी तिच्या अर्जुनसोबतच्या रिलेशनशिपवरून ट्रोल केलं जातं. मात्र असे जरी असली तरी मलायकाने कधीच तिचे अर्जुनसोबतचे नाते जगापासून लपवूव ठेवलेले नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Malaika arora