मलायकाला येतेय अरबाजची आठवण? शेअर केला 'हा' खास फोटो

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगा अरहानचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्या आणि अरबाजच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 03:05 PM IST

मलायकाला येतेय अरबाजची आठवण? शेअर केला 'हा' खास फोटो

मुंबई, 7 ऑगस्ट : अभिनेत्री मलायका अरोरा मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. पण त्याचबरोबर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगा अरहानचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे पुन्हा एकदा तिच्या आणि अरबाज खानच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. मलायकानं इन्स्टाग्रामवर अरहान आणि अरबाज यांचं कोलाज असलेला फोटो शेअर केला आहे या फोटोला तिनं, ‘अरहान तु तुझ्या बाबांची फोटो कॉपी आहेस.’ असं कॅप्शन दिलं आहे.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी घटस्फोट घेतला. अरहान हा या दोघांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये अरबाजनं आम्ही वेगळे झालो असलो तरीही एकमेकांचा तिरस्कार अजिबात करत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच आमच्या मुलासाठी एकत्र मिळून जे काही करावं लागेल ते सर्व आम्ही करू. तो खूप समजूतदार मुलगा असून त्याचा अभ्यास आणि त्याचे छंद या सर्वात तो खूप हुशार असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट बराच काळ चर्चेत राहिला. त्यानंतर आता मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं अर्जुनसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. तर दुसरीकडे अरबाज सुद्धा जॉर्जिया एंड्रियानीसोबत नात्यात आहे. जॉर्जिया खान कुटुंबीयांच्या अनेक महत्त्वाच्या फंक्शनमध्ये दिसते. अशात अरहानची जबाबदारी अर्थातच मलायकाकडे येते. मात्र काही महत्त्वाच्या वेळी अरबाजही त्यांच्यासोबत दिसतो. मात्र सध्या अनेकदा अरहान एकटाच दिसून येतो. त्यामुळे मलायकानं अशाप्रकारे अरहानसोबत अरबाजचा फोटो शेअर केल्यानं तिला अरबाजची आठवण येत असल्याचं म्हटलं जात आहे.

Loading...

===================================================

तुझ्यात जीव रंगला फेम राणादा आणि पाठकबाई अडकले पुरात; पाहा EXCUSIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...