घटस्फोटानंतर मलाकाच्या कुटुंबाशी असं आहे अरबाजचं नातं, अभिनेत्रीनं स्वतःच केला खुलासा

नाती अशी एका रात्रीत बनत नाहीत. त्यासाठी बराच वेळ जावा लागतो. त्यामुळे ही नाती खूपच स्पेशल असतात. असं मलायका म्हणते.

  • Share this:

मलायका अरोरा आणि अरबाज खान मागची अनेक एक आयडियल कपल मानले जात होते. मात्र 2016 मध्ये त्यांनी अचानक घटस्फोटाबद्दल सांगत सर्वांनाच धक्का दिला.

मलायका आणि अरबाज आता आपापल्या लाइफमध्ये पुढे गेले असले तरीही आपल्या मुलासोबत एकत्र वेळ घालवतात.

मात्र आता या दोघांच्या कुटुंबातील संबंध कसे आहेत. विशेष करुन अरबाज आणि मलायकाचे कुटुंबीय यांच्यातील संबंध कसे आहेत याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. पण आता या सर्वाचा खुलासा स्वतः मलायकानंच केला आहे.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मलायका तिची फॅमिली आणि अरबाज यांच्यातील नातेसंबंधांवर मनमोकळेपणे बोलली. आम्ही वेगळे झालेलो असलो तरी अरबाजसाठी माझ्या घरी काहीच बदललं नसल्याचं मलायकानं स्पष्ट केलं.

मलायका म्हणते, नाती अशी एका रात्रीत बनत नाहीत. त्यासाठी बराच वेळ जावा लागतो. त्यामुळे ही नाती खूपच स्पेशल असतात.

मलायका पुढे म्हणाली, माझी बहीण अमृता आणि अरबाज यांचं नातं खूप स्ट्राँग आहे. ते पुढेही तसंच राहिलं. माझे आई-बाबा सुद्धा अरबाजला आपला मुलगा मानतात. तर माझ्या दीरांशीही माझं चांगलं रिलेशन आहे.

अरबाज माझ्या फॅमिलीसाठी सामान्य व्यक्ती नाही. आजही तो माझ्या फॅमिलीचा भाग आहे. माझ्या फॅमिलीसाठी तो एक मुलगा आणि मित्र आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरबाज माझ्या मुलाचा पिता आहे आणि हे कधीच बदलणार नाही.

सध्या मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी आपल्या नात्याची कबूली दिली. त्यानंतर पहिल्यांदा अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं अर्जुनसोबत फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

या दोघांच्या लग्नाच्या चर्चा खूप झाल्या मात्र या दोघांनीही सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार नसून आम्ही एकमेकांना अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. सध्या हे दोघं पुन्हा एका व्हेकेशनसाठी रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या