मुंबई, 15 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यातील तिच्या कपड्यांमुळे तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं गेलं होतं. त्यानंतर आता मलायकाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना इशारा करताना दिसत आहे.
मलायकाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ती जिममध्ये जाताना दिसत आहे. त्यावेळी फोटोग्राफर्स तिचे फोटो काढण्यात बीझी आहेत. ती त्यांना गुड मॉर्निंग म्हणून पुढे निघून जाते मात्र काही अंतर पुढे गेल्यावर ती मागे वळते आणि फोटोग्राफर्सना मास्क लावण्याचा इशारा करते. 'बॉलिवूड पॅप' नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलं असून सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे.
पहिल्या ऑडिशनआधी वडिलांमुळे ढसाढसा रडली होती आलिया, वाचा नेमकं काय घडलं होतं
सध्या जगभारात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशात या व्हायरसमुळे 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रात या व्हायरसचे सर्वाधिक 32 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या जात असतानाच मलायकानं फोटोग्राफर्ससाठी दाखवलेल्या काळजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Birthday Special : हे पदार्थ आहेत आलिया भटचे वीक पॉइन्ट्स, तरीही राहते फिट!
मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर सध्या सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये ती परीक्षक म्हणून काम करत आहे. या शोमध्ये तिच्यासोबत टेरेंस लुइस आणि कोरिओग्राफर गीता कपूर हे सुद्धा परीक्षक आहेत. याआधी मलायका MTVच्या ‘इंडियाज बेस्ट सुपर मॉडेल’मध्ये परीक्षक म्हणून दिसली होती.
'त्या' बोल्ड वक्तव्यावर नेहा धुपियाचं लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण, म्हणाली...