मलायकानं शेअर केला पोल डान्स पोजमधला फोटो, अर्जुननं कमेंटमध्ये केली ‘ही’ मागणी

मलायकानं शेअर केला पोल डान्स पोजमधला फोटो, अर्जुननं कमेंटमध्ये केली ‘ही’ मागणी

Malaika Arora | Arjun Kapoor | मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला एक फोटो अर्जुनच्या कमेंटमुळे सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एजॉय करत आहेत. त्यांच्या या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहेत. अर्जुन कपूरच्या कुटुंबीयांसोबत मलायकाच फोटो व्हायरल झाल्यानंतर आता मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला एक फोटो सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. मालायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केल्यानंतर अर्जुन कपूरनं तिच्याकडे अशी मागणी केली की, हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला.

या आहेत सर्वात श्रीमंत 7 अभिनेत्री, मालमत्ता ऐकून पायाखालची जमीन सरकेल

View this post on Instagram

#pride #onlylove #pride🌈 #pridenyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती पोल पकडून पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये मलायकानं ट्यूब टॉप आणि हाफ जॅकेट घातलं आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. मलायकाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तर कमेंट केल्याच पण अर्जुनलाही तिच्या फोटोवर कमेंट करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यानं मलायकाच्या फोटोवर कमेंट करत एक मागणी केली, अर्जुननं लिहिलं, ‘फोटो क्रेडिट?’ यावरुन मलायकाचा हा फोटो अर्जुननंच क्लिक केल्याचं दिसून येतं.

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये धक्कादायक ट्विस्ट, गुरूला मिळणार 'अशी' शिक्षा

मलायका व्यतिरिक्त अर्जुननंही त्याच्या इन्स्टाग्राम अकउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो रस्त्यावर उभा राहून पोज देताना दिसत आहे. याआधी मलायका आणि अर्जुननं काका संजय कपूरच्या मुलासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरुन मलायका आणि कपूर फॅमिलीमधील जवळीक लक्षात येते. त्याअगोदर अर्जुनचा सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या स्क्रिनिंगला मलायका अर्जुनच्या बहीणी अंशुला आणि जान्हवीसोबत पोज देताना दिसली होती.

ऋषी कपूर यांनी पाहिला तब्बल 27 लाखांचा बूट, दिली भन्नाट प्रतिक्रिया

View this post on Instagram

New York, brick walls & me...

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर मलायका आणि अर्जुन न्यूयॉर्कला रवाना झाले होते. त्याआधी मुंबई एअरपोर्टला ते दोघंही एकत्र दिसले होते. अर्जुनच्या वाढदिवसाला सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहत मलायकानं नुकतीच प्रेमाची कबुली दिली.

=============================================================

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

First published: June 29, 2019, 10:26 AM IST

ताज्या बातम्या