Home /News /entertainment /

हॉट अॅण्ड बोल्ड Malaika Arora ची प्रॉपर्टी ऐकून चक्रावून जाल; इतके आहेत तिचे इनकम सोर्स

हॉट अॅण्ड बोल्ड Malaika Arora ची प्रॉपर्टी ऐकून चक्रावून जाल; इतके आहेत तिचे इनकम सोर्स

वयाच्या 47 व्या वर्षी मलायकानं स्वतःला पूर्णपणे फिट आणि मेंटेन केलंय. आजही तिच्या सौंदर्याचे दिवाने असलेल्यांची संख्या कमी नाही. मलायका आज रॉयल जीवन जगतेय.

    मुंबई, 26 सप्टेंबर : डान्सिंग स्टाईल, फिटनेस आणि बोल्ड अवतार यामुळं बॉलीवूड जगतात हवा करणारी अभिनेत्री मलायका अरोराला (malaika arora) कोणतीही वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. छैंय्या छैंय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यांमध्ये जबरदस्त डान्स करत तिनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. ती छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय आहे. मलायकानं (malaika arora) तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यानंतर ती अल्बम साँग गुर नाल इश्क मीठा आणि बॉलीवूड चित्रपट दिल सेमधील छैंय्या छैंया गाण्यात दिसली. वयाच्या 47 व्या वर्षी मलायकानं स्वतःला पूर्णपणे फिट आणि मेंटेन केलंय. आजही तिच्या सौंदर्याचे दिवाने असलेल्यांची संख्या कमी नाही. मलायका आज रॉयल जीवन जगतेय. रिपोर्ट्सनुसार, मलायकाकडं एकूण 73-75 कोटींची संपत्ती आहे. 2021 मध्ये तिची एकूण संपत्ती 10 दशलक्ष डॉलर्स असल्याचं सांगितलं जातंय. हे वाचा - बलात्कार पीडितेनं YouTube Video पाहून केला स्वत:चा गर्भपात; नागपुरातील तरुणीची झाली भयंकर अवस्था मलायका चित्रपटांमध्ये आयटम नंबरवर डान्स करण्यासाठी सुमारे 1.75 कोटी रुपये घेते. एवढंच नाही तर, मलायका नच बलिये, नच बलिये सीझन 2, जरा नचके दिखा, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी खूप मोठी रक्कम आकारते. रिपोर्ट्सनुसार, मलायका एका महिन्यात 60 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावते. एका एपिसोडसाठी 5 लाख आणि एका सीझनसाठी मलायका 1 कोटी रुपये घेते. याशिवाय, मलायकाच मुंबईत 'दीवा योगा' नावाचा एक योग स्टुडिओही आहे. तिथूनही तिच्या कमाईत मोठी भर पडते. हे वाचा - Bigg Boss Marathi 3: तृप्ती देसाई आणि शिवलीलामध्ये जोरदार राडा, बाचाबाचीनंतर आता पुढे काय होणार? मलायकाचं मुंबईतल्या वांद्रे परिसरात एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत काही कोटींमध्ये आहे. तसंच, मुंबईच्या इतर अनेक भागात तिची प्रॉपर्टी आणि घरं आहेत. मलायका अरोराला महागड्या आणि शाही वाहनांचीही खूप आवड आहे. तिच्याकडे Range Rover Vogue, BMW 7 Series 730Ld, Toyota Innova Crysta, BMW X7 अशी अनेक वाहनं आहेत. मलायकाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये 30 पेक्षा जास्त ब्रँड एंडोर्समेंट्सही समाविष्ट आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, Bollywood News

    पुढील बातम्या