अर्जुनला मिळालं खास बर्थ डे गिफ्ट, मलायकानं अशी दिली प्रेमाची कबूली Arjun Kapoor | Malaika Arora | Arjun Kapoor Birthday

अर्जुनला मिळालं खास बर्थ डे गिफ्ट, मलायकानं अशी दिली प्रेमाची कबूली Arjun Kapoor | Malaika Arora | Arjun Kapoor Birthday

Malaika Arora Wish Arjun Kapoor On Birthday : अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं काहीशा हटके अंदाजात त्याला विश करत पहिल्यांदाच प्रेमाची कबूली दिली.

  • Share this:

मुंबई, 27 जून : अभिनेता अर्जुन कपूरनं नुकताच त्याचा 34 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याला बॉलिवूड सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बर्थडे विश केलं. अर्जुनला बर्थडे विश करणाऱ्यांमध्ये त्याच्या नातेवईकांपासून ते जवळच्या मित्र मैत्रिणींपर्यंत सर्वांचा समावेश होता. मात्र सर्वांचं लक्ष लागलं होतं ते मलायकाच्या सोशल मीडिया पोस्टकडे काही दिवसांपूर्वीच अर्जुननं मलायकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केल्यांनंतर त्याचा हा पहिलाच वाढदिवस होता. अर्जुनच्या वाढदिवसाला मलायकानं काहीशा हटके अंदाजात त्याला विश करत पहिल्यांदाच प्रेमाची कबूली दिली.

बाहुबलीच्या 'देवसेने'चा झाला अपघात, थोडक्यात बचावला पाय

अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मलायकानं त्याच्या सोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती अर्जुनचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी आहे. हा फोटो शेअर करताना मलायकानं त्याला, ‘माझा क्रेझी, फनी आणि अमेझिंग अर्जुन कपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप प्रेम आणि नेहमी आनंदी राहा’ असं रोमँटिक कॅप्शन दिलं. अर्जुनचा फोटो इन्स्टाग्रामवर सार्वजनिकरित्या पोस्ट करण्याची मलायकाची ही पहिलीच वेळ आहे. अखेर दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली आहे. त्यामुळे वाढदिवसाला अर्जुनसाठी यापेक्षा बेस्ट गिफ्ट काय असू शकतं.

अभिनेत्री सुश्मिता सेनचा ब्रेकअप? स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडेलला करत होती डेट

 

View this post on Instagram

 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन कपूर आणि मलायका न्यूयॉर्कला रवाना झाले असून त्याआधी त्यांना मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी मलायका स्टायलिश लुकमध्ये दिसली होती. अर्जुनच्या बर्थडे फक्त मलाकानचं नाही तर अर्जुनच्या बहीणी अंशुला आणि जान्हवीनंही हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्या.

KGFस्टार यशने सांगितलं मुलीचं नाव, दोन दिवसांनी बायको म्हणाली मी पुन्हा प्रेग्नट

 

View this post on Instagram

 

Happy birthday bhai @arjunkapoor ❤️ I love you the mostest. You will always be the most important person in my life. You’ve got the biggest heart I’ve ever known & I’m so grateful that I have you, that I’ve always had you watching over me. Thank you for your unquestioning love & for always just being present for me, in every way that counts - as a brother, as a friend, as a parent, as a goofball, as my backbone, as my shoulder to lean on, as the hand on my head.. Thank you for pushing me to come into my own, to march to my own beat without any questions asked, for making sure I never fall too far in that journey, and for showing me through example that even when I fall down, I must get up and keep going, with unwavering faith in myself and my beliefs. You are my home, and that will never change. Love you to infinity ♾ #MyMostFavourite #MyNumeroUno #WhenHomeHasAHeartbeat #HappyBirthdayBhai

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor) on

याशिवाय अभिनेत्री सोनम कपूरनंही अर्जुनला बालपणीचा आणि आत्ताचा असे दोन फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.

अर्जुन आणि त्याची फॅमिली सोनम कपूरसाठी खूप खास आहे. त्यांच्यातील खास बाँडिंग वेळोवेळी दिसून येतं. अनेकदा ते एकत्र वेळ घालवताना दिसतात.

============================================================

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 09:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading