राहुल खन्नाच्या BOLD फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, मलायकानं केली ‘ही’ कमेंट

राहुल खन्नाच्या BOLD फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, मलायकानं केली ‘ही’ कमेंट

अभिनेता राहुल खन्नानं नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला ज्यावर कमेंट करण्यापासून बॉलिवूडमधले अनेक कलाकार स्वतःला थांबवू शकले नाहीत.

  • Share this:

मुंबई, 07 फेब्रुवारी : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत असते. पण सध्या ती अभिनेता राहुल खन्नाच्या बोल्ड फोटोवर कमेंट केल्यानं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसणाऱ्या राहुल खन्नानं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक असा फोटो शेअर केला की बॉलिवूडमधले अनेक कलाकार त्याच्या फोटोवर कमेंट करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. ज्यात मलायकाचाही समावेश आहे. मात्र तिच्या अशा कमेंटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अभिनेता राहुल खन्ना हा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. सोशल मीडियावर फार सक्रिय नसणाऱ्या राहुलनं नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. राहुलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो एक मिरर समोर न्यूड उभा असलेला दिसत आहे. यासोबतच त्यानं बाथरोब घातला आहे. तसेच डोळ्यांवर चश्मा आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या फोटोवर 26 हजार पेक्षा जास्त लाइक्स आणि 1700 पेक्षा जास्त कमेंट आलेल्या पाहायला मिळत आहे.

तापासीला 1-2 नाही तर खावे लागले तब्बल एवढे ‘थप्पड’, वाचा पडद्यामागे काय घडलं

 

View this post on Instagram

 

I feel there’s a lesson here about being in the right place at the right time. 📍

A post shared by Rahul Khanna (@mrkhanna) on

राहुलच्या चाहत्यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीही त्याच्या या फोटोवर कमेंट केल्या आहे. ज्यात करण जोहर, सिकंदर खेर आणि मलायका अरोरा यांचा समावेश आहे. करण जोहरनं या फोटोवर, ‘उफ्फ...’ अशी कमेंट केली आहे. तर सिकंदर खेरनं लिहिलं, ‘मी राहुलचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे काही लोकांनी नोकरी सोडली तर काही हे शहर सोडून पळू गेले. ते याच्या आसपास नव्हते त्यांनी फक्त याबद्दल ऐकलं होतं.’ पण या सर्वात मलायका अरोराच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधलं. राहुलच्या फोटोवर कमेंट करताना मलायकानं लिहिलं, मला वाटतं तो मिरर तोडायचा प्रयत्न करत आहे.

लग्नाआधी 10 वर्षं रिलेशिपमध्ये होता अंकुश चौधरी, बायको आहे प्रसिद्ध अभिनेत्री

राहुलच्या बॉलिवूड करिअर बद्दल बोलायचं तर त्यानं ‘1947 अर्थ’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय त्यानं दिल कबड्डी, लव्ह आज कल (2009), वेक अप सिड आणि फिअर फाइल्स या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र त्याचा कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही.

TRP मीटर :बायको' पडली 'सासूबाईं'वर भारी, पाहा तुमची मालिका कोणत्या स्थानावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 11:45 AM IST

ताज्या बातम्या