मलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं

मलायकाचा ‘हा’ फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, फिटनेससाठी वयाचं बंधन नसतं

मलायका अरोरा बॉलिवूडची फॅशनिस्टा असण्यासोबतच फिटनेस फ्रीक सुद्धा आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : मलायका अरोरा बॉलिवूडची फॅशनिस्टा असण्यासोबतच फिटनेस फ्रीक सुद्धा आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असलेली मालायका आपल्या खासगी जीवनात फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलला खूप महत्त्व देताना दिसते. ती नेहमीच योगा आणि वर्काआउटचे व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच मलायकानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे जो पाहिल्यावर सर्वांनाच वाटेल की फिटनेसला वयाचं बंधन मुळीच नसतं. मलायकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

मलायकानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका स्प्लिट करताना दिसत आहे. मलायकाचा हा फोटो तिच्या फ्लेक्सिबल बॉडीमुळे चर्चेत आला आहे. या फोटोला मलायकानं, ‘योग किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केल्यानंतर मला आनंदाची जाणीव होते. व्यायामानंतर माझं लक्ष केंद्रित होतं. मन शांत राहतं’ मलायकाचा हा स्प्लिट करतानाचा हा फोटो पाहिल्यावर फिटनेसासाठी वयाचं बंधन नसतं याची प्रचिती तुम्हाला येईल. या फोटोवर चाहते तिच्या फिटनेसचं कौतुक करताना दिसत आहेत. तर अनेकांनी अर्जुन लकी असल्याचं म्हटलं आहे.

अनुष्कानं सांगितलं वयाच्या 29 व्या वर्षी विराटशी लग्न करण्याचं कारण

 

View this post on Instagram

 

Doin yoga or any form of exercise makes me happy ,energised,focused ,but above all CALM .....#malaikasmondaymotivation .... make this Monday n every Monday count @thedivayoga @reebokindia @sarvesh_shashi

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे खूपच चर्चेत आहे. त्या दोघांमधील वयाच्या अंतरावरून त्यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. मात्र त्याचा मलायका-अर्जुनच्या नात्यावर अजिबात फरक पडलेला नाही. ते दोघं नेहमीच एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसातात. तसेच अर्जुनच्या वाढदिवसाला त्याचा फोटो शेअर करत मलायकानं त्यांच्या नात्याची जाहीर कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

वयाच्या 19 व्या वर्षी 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत कतरिनानं दिला होता लिपलॉक सीन

 

View this post on Instagram

 

Thank u @neetu54 n Rishi uncle for such a warm n lovely evening ♥️#Nyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अर्जुनच्या वाढदिवसासाठी मलायका आणि अर्जुन न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी त्यांनी अर्जुनचे काका संजय कपूर यांच्या फॅमिली सोबतही काही वेळ घालवला. तसेच त्यांनी ऋषी कपूर यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर भारतात परतल्यावर हे दोघं लवकरच लग्न करतील असं बोललं जात होतं मात्र अर्जुननं एका मुलाखतीत आम्हाला आता एकमेकांना आणखी जाणून घ्यायचं असून त्यासाठी आम्ही एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे सध्यातरी लग्नाचा काहीही विचार नसल्याचं त्यानं म्हटलं होतं.

अनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL

====================================================

कोंबडा भिडला सापला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 12:33 PM IST

ताज्या बातम्या