मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मुलाची आठवण येताच मलायका अरोराने केलं असं काही, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

मुलाची आठवण येताच मलायका अरोराने केलं असं काही, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षा बोल्ड लुक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षा बोल्ड लुक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षा बोल्ड लुक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 19 मार्च-   जगातील सर्वात सुंदर नातं म्हणून आई आणि मुलाच्या नात्याला ओळखलं जातं.आई आणि मुलांचं नातं खूप खास असतं. सामान्य माणूस असो की सेलिब्रिटी, तो आपल्या मुलांच्या सुखासाठी त्याच्या आनंदासाठी हवे ते प्रयत्न करत असतो. अभिनेत्री मलायका अरोराही   (Malaika Arora)  तिचा मुलगा अरहान खानवर  (Arhaan Khan)  खूप प्रेम करते. नुकतंच मलायकाला अरहानची इतकी आठवण आली की ती क्षणभरसुद्धा राहू शकली नाही आणि तिने थेट आपल्या मुलाला भेटण्यासाठी न्यूयॉर्क गाठलं. न्यूयॉर्कला   (New York)   पोहोचल्यानंतर अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या अभिनय आणि चित्रपटांपेक्षा बोल्ड लुक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते. तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच ती तिच्या चाहत्यांना आपल्या पर्सनल लाईफबद्दलदेखील अपडेट देत असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर सांगितले की, ती मुलगा अरहान खानला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचली आहे.

मलायकाने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले फोटो शेअर केले आहेत. न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर मलायका अरोराने फोटो शेअर करून आपल्या मुलाची पाठमोरी झलक दाखवली आहे. मलायकाने इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अरहान एका इमारतीसमोरून जाताना दिसत आहे. त्याने काळा आणि पांढरा शर्ट घातला आहे. मलायकाने आपल्या मुलाच्या मागे फिरताना हा फोटो क्लिक केला आहे.

अभिनेत्रीने अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'रीयुनायटेड' मलायका तिच्या मुलासोबत न्यूयॉर्कमध्ये मजामस्ती करत आहे. अभिनेत्री मुलगा अरहान खानसोबत शहरातील प्राचीन रस्ते आणि कला संग्रहालयाला भेट देण्यासाठी बाहेर पडली आहे.अरहान खान शिक्षणासाठी न्यूयॉर्कला गेला आहे. गेल्यावर्षी त्याने इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. अरहान मलायका आणि अरबाज खान यांचा मुलगा आहे .

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Malaika arora