अर्जुनच्या काकानं मलायका अरोराला केलं ट्रोल, वाचा फोटोवर केलेली 'ही' कमेंट

एकीकडे अर्जुन कपूर अशाप्रकारे मजेशीर कमेंट करुन कतरिना कैफला ट्रोल करत असतानाच दुसरीकडे त्याच्या काकानं मलायकावर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 09:35 AM IST

अर्जुनच्या काकानं मलायका अरोराला केलं ट्रोल, वाचा फोटोवर केलेली 'ही' कमेंट

मुंबई, 18 ऑगस्ट : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फिटनेस, ड्रेसिंग आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यामुळेच ती अनेकदा वाईटप्रकारे ट्रोलही होते. तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागत. मात्र यावेळी तिला ट्रोल करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचा काका संजय कपूर आहे.

मलायकानं तिच्या इन्स्टग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं Saturday Blues असं कॅप्शन दिलं होतं. मलायकाच्या याच फोटोवर संजय कपूरनं ‘बालीचा समुद्र एवढाही निळा नाही’ अशी कमेंट केली आहे. एकीकडे अर्जुन कपूर अशाप्रकारे मजेशीर कमेंट करुन कतरिना कैफला ट्रोल करत असतानाच दुसरीकडे त्याच्या काकानं मलायकावर निशाणा साधला आहे. तसं पाहायला गेलं तर संजय आणि मलायकामध्ये कोणतंही सिरिअस ट्रोलिंग नाही. ही फक्त तिला चिडवण्याच्या उद्देशानं केलेली कमेंट होती एवढंच.

Sacred Games 2 झाला ऑनलाइन लीक, निर्मात्यांना पायरसीचा फटका

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशिपबद्दल बोलायचं तर सध्या हे दोघंही बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत राहणारं कपल आहे. अर्जुनच्या वाढदिवसाला न्यूयॉर्क व्हेकेशनचे फोटो शेर करत मलायकानं अर्जुनसोबतचं नातं ऑफिशिअल केलं होतं. त्याशिवाय त्यांच्या या व्हेकेशनच्या इतर फोटोंमुळे ते सतत चर्चेत राहिले होते. नातं ऑफिशिअल केल्यानंतर आता हे दोघंही नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो बिनधास्त शेअर करताना दिसतात.

Loading...

शिल्पा शेट्टीनं नाकारली 10 कोटींची जाहिरात; कारण वाचून म्हणाल, वाह!

 

View this post on Instagram

 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अर्जुननं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं सांगितलं, ‘मी आपल्या नात्याविषयी जास्त काही बोलून त्याची तुलना करु इच्छित नाही. आम्ही दोघंही सध्या लग्न करण्याच्या विचारात नाही . त्यापेक्षा आम्ही दोघंही जास्तीत जास्त वेळ एकमेकांना देण्याच्या प्रयत्न करत आहोत आणि एकमेकांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.’

अर्जुन कपूर लागला कतरिनाच्या मागे; या फोटोवरून केलं ट्रोल

====================================================================

SPECIAL REPORT: 'माय नेम इज यश खान', मुस्लिम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...