Home /News /entertainment /

'मी वेडी नाही..ड्रेसिंग सेंसवरुन ट्रोल करणाऱ्यांना Malaika Arora ने दिले सडेतोड उत्तर

'मी वेडी नाही..ड्रेसिंग सेंसवरुन ट्रोल करणाऱ्यांना Malaika Arora ने दिले सडेतोड उत्तर

Malaika Arora

Malaika Arora

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. ट्रोलर्सला मलायकानं आता सडेतोड उत्तर दिले आहे.

    मुंबई, 24 जानेवारी: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मलायका नेहमी आपल्या सोशल अकाऊंटवर वेगवेगळ्या लुकमध्ये बोल्ड अंदाज शेअर करत असते. ती आपला फिटनेस आणि ड्रेसिंग स्टाईल, हॉट लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेक वेळा मलायकाला नेटकरी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ट्रोल करतात. मात्र तिने आता गप्प न बसता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वी मलायकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये कोविड प्रोटोकोल्सचं पालन करत तिने तोंडाला दोन मास्क लावले होते. पण नेटिझन्सनी वेगळ्याच मुद्द्यावरून तिला ट्रोल केले. मलायका पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना तिने जे कपडे घातले होते त्यावरून ती ट्रोल झाली. ब्रा न घालता फक्त शर्ट घालून कशी घराबाहेर जाते, मास्क लावला मग हे असे कसे ब्रा लेस कपडे घालते म्हणत तिला अनेकांनी ट्रोल केले होते. एका मुलाखतीमध्ये तिने ट्रोलर्सवर भाष्य केले. 'अनेकवेळा महिलेला तिच्या शॉर्ट स्कर्टवरून तसेच नेकलाइनवरून ट्रोल केले जाते. प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे कपडे घातल असतात. ट्रोल करणारे व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं विचार करत असतात. पण मी माझ्या आवडीनुसारच कपडे घालणार. मी कम्फर्टेबल असेल तर मी ते कपडे घालणार मी वेडी नाहिये मला माहित आहे कशा प्रकारचे कपडे मला सूट होतात. माझी मर्जी मी कोणतेही कपडे घालेन. ' तसेच स्किन, बॉडी आणि वय यासर्वात मी कम्फर्टेबल असेल तर मी असे कपडे घालेन आणि असेच जगेन. अशे ठाम मतही तिने यावेळी मांडले. अशा शब्दात ड्रेसिंग सेंसवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने सडेतोड उत्तर दिले आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment, Malaika arora

    पुढील बातम्या