मुंबई, 9 एप्रिल- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. (Malaika Arora accident). तिच्या कारला दुसऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खालापूर टोलनाक्यावर ही घटना घडली होती. मलायकाला नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं (Malaika Arora latest news).
अपघातानंतर अभिनेत्रीची पहिली पोस्ट-
अभिनेत्री मलायका अरोराने कार अपघातानंतर इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आपल्यावर आलेल्या संकटांचा उल्लेख करत त्यातून बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त केले आहेत.
मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट करत लिहिलंय, ''गेले काही दिवस आणि त्यामध्ये घडून गेलेल्या घटना अगदी अविश्वसनीय आहेत. त्याबद्दल आज विचार करताना सर्वकाही एखाद्या चित्रपटासारखं वाटतं. असं वाटतं की घडलेल्या या सर्व गोष्टी खऱ्या नसाव्यात. परंतु अपघातानंतर लगेचच संरक्षक देवदूतांच्या मदतीने मला आता स्वस्थ वाटत आहे''.
मलायकाने पुढे लिहिलंय, ''मग ते संरक्षक दूत डॉक्टर्स असो, अपघातानंतर लगेचच मला रुग्णालयात पोहोचवणारे लोक असोत, माझे काळजी घेणारे कर्मचारी असोत, या संकटकाळात ठामपणे माझ्या पाठीशी उभे असणारे माझे कुटुंबीय, मित्र असोत किंवा माझे सर्व चाहते असोत. या सर्वांच्या प्रार्थनेच हे संकट टळलं आहे. या सर्वांच्या शुभेच्छा आणि काळजीनेच मला लवकर बरे वाटत आहे. असे क्षण स्मरणप्रमाणपत्रे असतात, जेणेकरून आपण आपल्या या सर्व चाहत्यांशी, आपल्या लोकांशी कृतज्ञ राहण्यासाठी. या सर्वांचं प्रेम माझ्यासाठी फारच आश्वासक होतं.ही फार मोठी गोष्ट आहे, की ओळखीचे आणि अनोळखी लोक तुमच्यासाठी प्रार्थना करत असतात जेव्हा तुम्हाला खरंच त्याची फार गरज असते'. असं म्हणत अभिनेत्रीने सर्वांचे आभार मानत प्रेमम व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
मलायकाच्या कारचा अपघात-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक झालं होतं. त्यावेळी काही गाड्या एकमेकांना धडकल्या. तीन-चार गाड्यांची टक्कर झाली. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला होता. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये मलायकाची कारही होती. गाडीला अपघात झाला तेव्हा मलायका गाडीत होती. अपघातात ती जखमी झाली होती. सुदैवाने थोडक्यात ती बचावली. तिला लगेच नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Malaika arora