कपूर फॅमिलीमध्ये मलायकाची एंट्री, संजय कपूरच्या पत्नीनं शेअर केला फोटो Malaika Arora | Arjun Kapoor | Sanjay Kapoor

कपूर फॅमिलीमध्ये मलायकाची एंट्री, संजय कपूरच्या पत्नीनं शेअर केला फोटो Malaika Arora | Arjun Kapoor | Sanjay Kapoor

Malaika Arora | Arjun Kapoor | Sanjay Kapoor | बॉलिवूडचं बहुचर्चित कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जून : बॉलिवूडचं बहुचर्चित कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे. नुकतंच अर्जुनच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली देत मलायकानं त्याला खास पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. यासोबतच तिनं पहिल्यांदाच अर्जुनचा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. पण आता न्यूयॉर्कमधील त्यांच्या वेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मलायका कपूर फॅमिलीच्या किती जवळ आली आहे हे दिसून येत आहे.

VIDEO : निकच्या सतर्कतेमुळे मोठ्या दुर्घटनेतून वाचली प्रियांका चोप्रा

 

View this post on Instagram

 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

सध्या अर्जुन मलायका न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. पण आता याच ठिकाणी अर्जुनचा काका म्हणजेच अभिनेता संजय कपूर सुद्धा पत्नी मिहिप आणि मुलगा जहान यांच्यासोबत न्यूयॉर्कला पोहोचला आहे. दरम्यान हे सर्वजण एकमेकांना भेटले. त्यांच्या या भेटीचा एक फोटो संजयची पत्नी मिहिपनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्यांचा मुलगा जहान हा मलायका आणि अर्जुनच यांच्या मधोमध उभा असलेला दिसत आहे.

VIDEO: सामना पाहायला गेलेल्या सैफ अली खानचा पाकिस्तानी चाहत्याने उडवली थट्टा

 

View this post on Instagram

 

Basking in neon ....#mycolouroftheseason#nyc#

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

या फोटोमध्ये हे तिघंही एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना मिहिपनं, जय हिंद असं कॅप्शन दिलं आहे आणि या फोटोवर मलायकानंही ‘सो कॅन्डिड’ अशी कमेंट केली आहे.

कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का

 

View this post on Instagram

 

#JaiHind 🇮🇳❤️

A post shared by Maheep Kapoor (@maheepkapoor) on

संजय कपूरच्या पत्नीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ज्याप्रकारे हे दिघंही एकमेकांसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत त्यावरुन मलायकानं कपूर फॅमिलीमध्ये स्वतःची जागा पक्की केल्याचं दिसत आहे. मलायका-अर्जुन यांच्या नात्याची बराच काळ चर्चा झाली. मात्र त्यांनी कधीच त्यांच्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नव्हता. पण काही दिवसांपूर्वीच अर्जुननं ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबुल केलं. पण सध्या तर लग्नाचा कोणताही विचार केला नसल्याचंही त्यानं यावेळी स्पष्ट केलं होतं. तर मलायकानंही नुकतीच अर्जुनच्या वाढदिवसांच्या निमित्तानं आपल्या प्रेमाची कबुली दिली.

==================================================================

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईवर पाणीबाणीचं सावट

First published: June 28, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading