Home /News /entertainment /

पाण्यात लावली आग! मलायका अरोरानं बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्येच केला योगा, पाहा PHOTO

पाण्यात लावली आग! मलायका अरोरानं बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्येच केला योगा, पाहा PHOTO

मलायकानं (Malaika arora) इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो (Photo) शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये (Swimming pool) उतरली असून पाण्यातच योगा (Yoga) करताना दिसत आहे.

  मुंबई, 05 जानेवारी: बॉलिवूडची (Bollywood) 'मुन्नी' म्हणजेच मलायका अरोरा (malaika Arora) सध्या गोव्यात (Goa) आपला प्रियकर अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) सुट्ट्या घालवत आहे. या दोघांच्या गोवा ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होत आहेत. मलायकानं एकामागून एक अशी अनेक हॉट फोटो (Hot Photos) शेअर करून सोशल मीडियावर (Social media) धुमाकुळ घातला आहे. आता मलायकानं आणखी एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती पाण्याच्या आत योगा (yoga) करताना दिसत आहे. मलायका अरोरा आपल्या फिटनेसमुळं नेहमी चर्चेत असते. ती भलेही सुट्टीवर असेल पण ती आपला वर्कआउट करणं सोडत नाही. मलायकानं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये उतरली असून पाण्यातच योगा करताना दिसत आहे. यावेळी तिनं हा फोटो शेअर करताना योगाच्या नावाबरोबर या योगाचे फायदेही सांगितले आहेत. आपल्या पोस्टमध्ये मलायकानं योगाचं सविस्तर माहिती दिली आहे. हा फोटो शेअर करताना मलायका अरोरानेही एक संदेशही लिहीला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की,  'चला नवीन वर्षाच्या दिवशी वर्कआउट्स आणि योगा करुन नवीन आठवड्याची सुरुवात करूया.'
  मलायक अरोरा पहिल्यापासून आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच गंभीर आहे. लॉकडाऊनच्या काळातही मलायकानं लोकांना घरी राहून स्वतः च्या फिटनेसची काळजी कशी घ्यायची? याची माहिती देत होती. मलायका अरोरा आपल्या फोटोंमुळं सोशल मीडियावर खुपच लोकप्रिय आहे. मलायकानं आताही काही लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर केले आहेत. जी प्रचंड व्हायरल झाली आहेत, ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. यासोबतच मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या रोमँटिक फोटोंचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरही मलायकानं दोघांचा एकत्रित फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं होतं. हा फोटो अर्जुन आणि मलायकाच्या चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Malaika arora

  पुढील बातम्या