Birthday Bash बेधुंद होऊन नाचले मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर, पाहा Video

Birthday Bash बेधुंद होऊन नाचले मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर, पाहा Video

या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या अर्जुन कपूर आणि आणि मलायकाच्या जोडीवरच.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर- बॉलिवूडची छैंया छैंया गर्ल मलायका अरोराने मंगळवारी आपला वाढदिवसाची ग्रँड पार्टी दिली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यात सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या अर्जुन कपूर आणि आणि मलायकाच्या जोडीवरच. मलायकाच्या बर्थडे पार्टीला अर्जुनने फक्त हजेरीच लावली असं नाही तर त्याने बेधुंद होऊन नाचही केला. यात मलायकाही तरी कशी मागे राहील. सध्या सोशल मीडियावर या पार्टीतले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

#Repost And the birthday girl ❤ #mallaikaarorakhan @malaikaaroraofficial #bollywood #actress #party #karanjohar #deepikapadukone #arjunkapoor #varundhawan #malaikaarorakhan #malaikaarora #azeem_showbiz #karishmakapoor #birthdaygirl #birthdaygirl

A post shared by Azeem_showbiz36 (@azeem_showbiz36) on

आज म्हणजे 23 ऑक्टोबरला बॉलिवूडची दिवा मलायका अरोरा 46 वर्षांची झाली. विशेष म्हणजे 6 वर्षांनंतर मलायकाने तिचा वाढदिवस एवढ्या थाटात साजरा केला. गेल्या सहा वर्षात मलायकाने अशा प्रकारची बर्थडे पार्टी कधी दिली नव्हती आणि वाढदिवसही साजरा केला नव्हता. अगदीच झालं तर ती सुट्ट्यांचा आनंद लुटायला बाहेर गेली होती. याबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, 'गेल्या सहा- सात वर्षात असं पहिल्यांदा होतंय की मी मुंबईत आहे. त्यामुळे मित्र- परिवारासोबत हा वाढदिवस साजरा करण्याचा मी विचार केला.'

 

View this post on Instagram

 

#properpatola #arjunkapoor #lastnight #MalaikaArora #bdayparty #bollywood #party

A post shared by ARJUN ADDICT ✨ (@arjunaddict) on

मंगळवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिने वाढदिवसाची ग्रँड पार्टी दिली होती. या पार्टीला करीना कपूर, करण जोहर, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, अनन्‍या पांडे, जान्हवी कपूर, शिल्‍पा शेट्टी, राजकुमार राव, तारा सुतारिया यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. याच पार्टीतले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात अर्जुन आणि मलायका भान हरपून नाचताना दिसत आहेत.

मलायका अरोराने वाढदिवसाला चंदेरी रंगाचा मिनी ड्रेस घातला होता. या पार्टीत तिचा मुलगा अरहान खानही होता. त्याच्यासोबतच मलायकाने केक कापला. मलायकाने पती अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्यांदा वाढदिवसाची पार्टी ठेवली. घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनमध्ये जवळीक वाढत गेली आणि काही महिन्यांनी दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं.

 

View this post on Instagram

 

Mere Arjun aur Arjun aagaye... Happy birthday #Malla have a beautiful one. @malaikaaroraofficial @arjunkapoor #agelessMalikaa

A post shared by Arjun (@rampal72) on

 

View this post on Instagram

 

You can't sit with us!

A post shared by Kareena Kapoor Khan FC (@kareenakapoorteam) on

'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

...पण अखेरच्या क्षणी सलमानच्या लग्नात आली 'ही' अडचण, 20 वर्षांनंतर सत्य समोर

अक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 10:52 AM IST

ताज्या बातम्या