आधी फक्त शर्ट घालून बाहेर पडली, आता मेकअपमुळे फसली मलायका अरोरा

आधी फक्त शर्ट घालून बाहेर पडली, आता मेकअपमुळे फसली मलायका अरोरा

काही दिवसांपूर्वीच तिचे शर्ट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण यापेक्षाही ती तिचे फोटो आणि व्हिडीओमुळेच जास्त चर्चेत असते. तिच्या फिटनेस अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचे शर्ट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर आता तिचा नुकताच शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. काहींनी मलायकाच्या या लुकचं कौतुक केलं आहे तर काहींना मात्र या फोटोमधील तिचा मेकअप आवडलेला नाही त्यामुळे तिच्यावर टीका सुद्धा होताना दिसत आहे.

मलायका अरोरानं काही दिवसांपूर्वी एक योगा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता त्यानंतर आता नुकताच तिनं क फोटो सुद्धा शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर मेकअप दिसत आहे. तिचा हा लुक काही लोकांना आवडला असला तरीही काहींनी मा तिला या मेकअपमुळे ट्रोल केलं आहे. एका युजरनं लिहिलं, तुझ्या चेहऱ्यावर मेकअप आहे की तु मेकअपवर आहेस हेच समजत नाही. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, तु मेकअप शिवाय सुद्धा खूप चांगली दिसतेस.

मालिकेत बहीण-भाऊ, खऱ्या आयुष्यात मात्र करतायेत एकमेकांना डेट

मेकअपमुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारी मलायका पहिली अभिनेत्री नाही. याआधी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल सुद्धा मेकअपमुळे ट्रोल झाली होती. त्यानंतर तिच्या मेकअप आर्टीस्टला तिच्या मेकअचा ओरिजिनल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करावा लागला होता. रानू मंडल यांच्या मेकअप लुकवर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बॉलिवूडचे हे कलाकार सेरोगसीच्या मदतीनं झाले आई-बाबा!

मलायका अरोरानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती एक कठिण योग करताना दिसत होती. विशेष म्हणजे मलायकाच्या या व्हिडीओवर अर्जुन कपूरचा काका अभिनेता संजय कपूरनं कमेंट केली होती. यशिवाय फराह खाननं सुद्धा मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट केली होती.

'अजित पवार म्हणजे धोबी का पप्पू' बॉलीवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली

======================================

First published: November 27, 2019, 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading