फॅशनच्या नादात मलायका अरोरा पुन्हा एकदा झाली ट्रोलिंगची शिकार

फॅशनच्या नादात मलायका अरोरा पुन्हा एकदा झाली ट्रोलिंगची शिकार

नेहमीच बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून ओळखली जाणारी मलायका नेहमीच तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

  • Share this:

मुंबई, 22 जून : बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. मागच्या नेक दिवसांपासून या दोघांच्याही लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अर्जुन आणि मलायकानं या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं. आम्ही सध्या लग्न करण्याचा विचारात नाही पण जेव्हाही लग्न करू त्यावेळी कोणापासूनही ते लपवणार नाही असं एक मुलाखातीत अर्जुननं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता मलायका तिचा 16 वर्षीय मुलगा अरहान खान सोबत फिरताना दिसली. मात्र त्यावेळी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आलं होत. त्यानंतर आता पुन्हा एकदा फॅशनच्या नादात मलायकाला ट्रोल व्हावं लागलं आहे.

दीपिकासोबत समलैंगिक रिलेशनशिपमध्ये राहायचंय, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा

 

View this post on Instagram

 

#tuesdayteachings .... 5 steps on how u can learn to tie a ponytail ‍♀️‍♀️ ......#tossntie (swipe right )

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

नुकतंच आपल्या मैत्रिणींसोबत लंचसाठी गेलेली मलायका कॅमेऱ्यात कैद झाली आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र या फोटोंमुळे मलायकाला पुन्हा एकदा ट्रोल व्हावं लागलं. मलायका यावेळी ऑलिव्ह ग्रीन कलरच्या स्ट्रॅप ड्रेसमध्ये दिसली. जेव्हा ती गाडीतून उतरून कॅमेरऱ्यासमोर आली तेव्हाही ती या ड्रेसमध्ये मलायका स्वतःही कंफर्टेबल नव्हती. रेस्टॉरंट बाहेर ती अनेकदा हा ड्रेस ठीक करताना दिसली. पण तिच्या या ड्रेसमुळे तिला आता सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. एका युजरनं तिच्या या ड्रेसला अजिब म्हटलं आहे तर काही युजर्सनी तिला घाईघाईत नाइटी घालून आलीस का असं विचारत ट्रोल केलं आहे.

VIDEO : वाऱ्याच्या वेगानं धावला सलमान खान, घोड्यालाही टाकलं मागे

नेहमीच बॉलिवूडची फॅशन दिवा म्हणून ओळखली जाणारी मलायका नेहमीच तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशाप्रकारे कपड्यांवरून ट्रोल होण्याची ही मलायकाची पहिली वेळ नाही. याआधीही कधी ड्रेस तर कधी हॉट फोटोशूटमुळे मलायकाला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या चाहत्यांनी तिला मुलासोबत फिरायला जाताना व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला होता. मात्र या ट्रोलिंगचा मलायकावर फारसा परिणाम दिसून येत नाही. तसेच अर्जुन आणि तिच्या वयातील अंतरामुळेही तिला अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे.

VIRAL VIDEO : ‘मलंग’च्या सेटवर स्टंटशूट दरम्यान दिशा पाटनीला दुखापत

===================================================

VIDEO : रुग्णालयात झोपलेले असताना शर्टात घुसला साप, तरीही आजोबा डाराडूर झोपले!

First published: June 23, 2019, 7:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading