वयाच्या 46 व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा, 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट!

वयाच्या 46 व्या वर्षी तोडल्या बोल्डनेसच्या सीमा, 11 वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट!

ती भलेही 46 वर्षांची झाली असेल पण आजही सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींना ती फिटनेसमध्ये मात देते. त्यामुळेच बिकिनी घालताना तिला तिच्या फिगरचा थोडाही विचार करावा लागत नाही.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेससाठीच जास्त चर्चेेत असते. सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात पण त्यात मलायकाची ओळख ही इतरांपेक्षा वेगळी आहे. मलायका आज तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती भलेही 46 वर्षांची झाली असेल पण आजही सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींना ती फिटनेसमध्ये मात देते. त्यामुळेच बिकिनी घालताना तिला तिच्या फिगरचा थोडाही विचार करावा लागत नाही.

मलायका सोशल मीडियावरही सक्रिय आहे. अनेकदा ती स्वतःचे बिकीनी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अनेकदा या फोटोंमुळे तिला ट्रोलही केलं जातं. पण तरीही ती स्वतःचे हॉट फोटो टाकणं काही सोडत नाही. मलायकाचा हाच बोल्ड अंदाज तिला इतरांपेक्षा वेगळं करतं. याशिवाय तिचं खासगी आयुष्यही सर्वांपासून लपलेलं नाही.

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिचं नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडलं गेलं. काही महिन्यांनी मलायका आणि अर्जुनने ते एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं. मलायका अर्जुनपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. त्यांच्या वयातील फरकामुळेही त्यांना अनेकवेळा ट्रोल केलं जातं. यावर बोलताना तिने स्पष्ट केलं की, तिला वयातील अंतराचा काहीच फरक पडत नाही.

मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात वीजे म्हणून केली होती. एमटीव्ही चॅनलसाठी ती काम करायची. मलायकाने मॉडेलिंगनंतर अल्बम आणि आयटम नंबरमधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिचं छैंया छैंया गाणं आजही चाहत्यांच्या हिट लिस्टमध्ये आहे. मलायकाने आयटम नंबरशिवाय काही सिनेमांमध्ये कामही केलं, पण तिला ओळख तिच्या डान्स नंबरमुळेच मिळाली.

मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. दोघांची पहिली भेट एका कॉफीच्या जाहिरातीवेळी झाली. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघं वेगळे झाले. दोघांचा घटस्फोट झाला असला तरी मलायका आणि अरबाजचं नातं लग्नानंतरही चांगलं आहे.

'या' अभिनेत्याकडे जेवायलाही नव्हते पैसे, असा भरायचा शाळेची फी

Birthday Bash बेधुंद होऊन नाचले मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर, पाहा Video

अक्षयचे सिनेमे हिसकावतोय 'हा' हिरो, सलग दुसऱ्या सिक्वेलमध्ये दिसणारा 'तो' कोण?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 23, 2019 12:20 PM IST

ताज्या बातम्या