• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • यामध्ये Arjun Kapoor च बेस्ट; Malaika arora ने उलगडलं आपलं बेडरूम सिक्रेट

यामध्ये Arjun Kapoor च बेस्ट; Malaika arora ने उलगडलं आपलं बेडरूम सिक्रेट

मलायका अरोराने सर्वांसमोरच अर्जुन कपूरबाबत एक गुपित उलगडलं आहे.

  • Share this:
मुंबई, 23 सप्टेंबर : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि बॉलिवूड दिवा मलायका अरोराचं (Malaika Arora) नातं आता लपून राहिलेलं नाही. या दोघांनीही आपण एकमेकांना डेट करत असल्याचं कबूल केलं आहे. मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये या दोघांबाबत सतत चर्चा सुरू असतात. हे दोघेही बऱ्याच वेळा डिनर डेट किंवा आऊटिंगसाठी (Arjun Malaika dating) एकत्र जाताना दिसतात. या सगळ्यातच आता मलायकाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. यामध्ये ती अर्जुन कपूरबाबत (Malaika talks about Arjun) काही खास गोष्टी सांगत आहे. यासोबतच, ती या व्हिडिओमध्ये तिला कसे पुरूष आवडतात हेदेखील सांगत आहे (Malaika arora said arjun kapoor is best kisser). एमटीव्हीच्या ‘सुपरमॉडेल ऑफ दि इयर सीझन 2’ या (Supermodel of the year season 2) कार्यक्रमात मलायकाने पाहुणी म्हणून हजेरी लावली होती. यावेळी शोचे होस्ट मिलिंद सोमण (Milind Soman Malaika Arora) यांनी तिची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा काही भाग एमटीव्हीच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन (MTV Twitter) शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ साधारणपणे 38 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येतं, की मिलिंद सोमण मलायकाला प्रश्न विचारत आहेत. एक आयडिअल मॅन कसा असावा, असं विचारल्यानंतर मलायकाने आपली आवड (Malaika’s ideal man) सांगितली. हे वाचा - सलमानपासून रियापर्यंत बॉलिवूडच्या या कलाकारांना खावी लागली आहे जेलची हवा! ती म्हणाली, “मला खरं तर रफ मुलं आवडतात. जी मुलं एकदम भयंकर फ्लर्ट करतील. शिवाय जे चांगल्या प्रकारे किस करू शकतील. यासोबतच त्यांना दाढी असणं अगदी गरजेचं आहे. मला क्लीन शेव्ह केलेली ‘चिकनी’ मुलं आजिबात नाहीत आवडत.” यावेळी तिने अर्जुनचा आवर्जून उल्लेख केला. ती म्हणाली, अर्जुन कपूर तिला सर्वात चांगल्या प्रकारे किस (Arjun Kapoor best kisser) करतो. यासोबतच तिला सर्वात चांगल्या प्रकारे ओळखणारी व्यक्तीही अर्जुनच असल्याचं तिने या शोमध्ये सांगितलं. अर्जुन कपूरला तू शेवटचा टेक्स्ट मेसेज काय पाठवला होता? असं विचारल्यानंतर तिने लाजून “आय लव्ह यू 2” असं उत्तर दिलं. हे वाचा - 'शेफाली'चे Mumbai Indians संघासोबतचे PHOTO व्हायरल; काय आहे कनेक्शन? तुझा सेलिब्रिटी क्रश कोण आहे असं विचारल्यानंतर मलायकाने हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगचं नाव घेतलं. जेम्स बाँड या रोलसाठी डॅनियल जगप्रसिद्ध आहे. तर फीमेल क्रशबाबत विचारलं असता, तिनं बेला हदीदचं नाव घेतलं. बेला ही एक २४ वर्षांची मॉडेल आहे. 2016 मध्ये ती अमेरिकेची मॉडेल ऑफ द इयर होती.
First published: