मलायका आणि मॉडेलमध्ये कॅटफाइट, अरबाज खान आहे कारण?

मलायका आणि मॉडेलमध्ये कॅटफाइट, अरबाज खान आहे कारण?

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेऊन आता जवळपास 2 वर्षं उलटली. पण काही ना काही कारणानं हे दोघंही चर्चेत असतात.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेऊन आता जवळपास 2 वर्षं उलटली. एवढंच नाही तर हे दोघंही आता आपापल्या पार्टनरसोबत खूश आहेत. अनेकदा काही ना काही कारणानं हे दोघंही चर्चेत येतात. आता नुकतंच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलायका आणि तिच्या शोमधील एक मॉडेल यांच्यात खूप भांडणं होत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेलं मात्र या भांडणाचं कारण अरबाज खान आहे.

मलायका अरोरा पुन्हा एकदा तिचा टीव्ही शो 'एमटीवी सुपरमॉडल ऑफ द ईयर'चा नवा सीझन घेऊन येत आहे. याशोमध्ये मलायका अरोरा, मिलिंद सोमन आणि डिझायनर मसाबा गुप्ता परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. तर या शोमध्ये सुपर मॉडोल उज्वल्ला राउत या सर्व मॉडेल्सची मेंटर म्हणून काम पाहणार आहे. सध्या या शोचं शूटिंग सुरू असून पिंकव्हिलानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उज्वल्ला आणि मलायका यांच्यात मागच्या काही दिवसांपासून खूप भांडणं होत आहेत. त्यामुळे या शोच्या मेकर्सना बऱ्याच समस्यांना द्यावा लागत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शोच्या सेटवर या दोघींची जबरदस्त कॅटफाइट होत आहे.

पहचान कौन! हातात बॅट घेतलेला हा चिमुरडा आहे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा स्टार

या शोचे मेकर्स भांडण व्हायला नको म्हणून दोघींचही वेगवेगळं शूट करत आहे. उज्वल्ला तिच्या आणि अरबाजच्या नात्याचा दिखावा या शोच्या सेटवर करत आहे. याशिवाय ती नेहमीच अरबाजनं तिला पाठवलेले मेसेज आणि फोटो क्रू मेंबर्सना दाखवत असते. असं काही करुन ती नेहमीच या सेटवर चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे.

अ‍ॅमेझॉनच्या सीईओंसाठी शाहरुख खानने बदलला त्याचा सुपरहिट डायलॉग

 

View this post on Instagram

 

The blues.....🎷🎺🎼

A post shared by Ujjwala Raut (@ujjwalaraut) on

दुसरीकडे मलायका मात्र या सर्व प्रकारामुळे खूपच त्रासली आहे. पण तरीही तिनं तिचं संतुलन ढळू दिलेलं नाही. ती हा सर्व प्रकार मोठ्या सफाईदारपणे हाताळत आहे. या शोमध्ये देशभरातून आलेल्या 10 तरुणी मॉडेलिंगच्या जगात स्वतःला पारखण्याचं काम करणार आहेत. या शोमध्ये त्यांना वेगवेगळ्या कॉन्टेस्ट पार करायच्या आहेत. ज्यानंतर या 10 मॉडेल्समधून एक सुपर मॉडेल निवडली जाणार आहे.

साराच्या समोर कार्तिकनं सांगितला त्याचा Valentine प्लान, अशी असेल 'डेट नाइट'

First published: January 18, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading