...तर मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा येणार एकत्र?

Malaika Arora and Arbaz Khan : मलायका अरोरा आणि अरबाज यांचा घटस्फोट होऊन जवळपास 2 वर्ष होत आली तरीही हे दोघंही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 02:18 PM IST

...तर मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा येणार एकत्र?

मुंबई, 27 जून : मलायका अरोरा आणि अरबाज यांचा घटस्फोट होऊन जवळपास 2 वर्ष होत आली तरीही हे दोघंही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतात. एकीकडे मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे तर दुसरीकडे अरबाज गर्लफ्रेंड जॉर्जिया अँन्ड्रियनीसोबत स्पॉट होताना दिसतो. अरबाज आणि मलायकानं 18 वर्षांच्या संसारानंतर 2017मध्ये त्यांच्यातील नातं संपवत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आता पुन्हा एकदा अरबाज आणि मलायका एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.

रणवीर सिंहला मागे टाकत विकी कौशल बनला सॅम मानेकशॉ, पाहा फर्स्ट लुक

मलायका आणि अरबाजचा भलेही घटस्फोट झाला असला तरीही ते दोघंही पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. मात्र हे रिअल लाइफमध्ये नाही तर एका टीव्ही शोमध्ये या दोघांच्या एकत्र येण्याची शक्यता आहे. ‘द कपिल शर्मा शो’ नंतर सलमान खान आता ‘नच बलिए’चा 9वा सीझनचा निर्माता म्हणून काम पाहणार आहे. या शोमध्ये 5 अशा जोड्या असणार आहेत जे एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत आणि 5 जोड्या अशा असतील ज्यांचं ब्रेकअप झालं आहे. ही या शोच्या 9व्या सीझनची थीम आहे. अशात परीक्षकांच्या रिकाम्या खुर्चीत मलायका आणि अरबाज बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वेगळ्या झालेल्या कपलमध्ये या दोघांची चर्चा खूप जास्त आहे. या शोच्या टीमशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाज आणि मलायकाला या शोमधील प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

‘देशासाठी लढा.. जिंकण्यासाठीच लढा..’ सॅम मानेकशॉ यांचे हे 5 कोट एकदा वाचाच!

Loading...

एकीकडे मलायका एक उत्कृष्ट डान्सर आहे. तर अरबाजची पर्सनॅलिटी सगळीकडे चर्चेचा विषय असते. त्यामुळे या शोच्या जजच्या खुर्चीसाठी अरबाज आणि मलायका परफेक्ट असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप या दोघांनीही या विषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा शो सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

VIDEO : अक्षय कुमारच्या ‘टिप-टिप बरसा पानी’वर आलिया भटचा हॉट डान्स

 

View this post on Instagram

 

Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor ... love n happiness always

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

दरम्यान नुकतंच अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मलायकानं त्याच्या सोबतचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात ती अर्जुनचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून उभी आहे. हा फोटो शेअर करताना मलायकानं त्याला, ‘माझा क्रेझी, फनी आणि अमेझिंग अर्जुन कपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप प्रेम आणि नेहमी आनंदी राहा’ असं रोमँटिक कॅप्शन दिलं. अर्जुनचा फोटो इन्स्टाग्रामवर सार्वजनिकरित्या पोस्ट करण्याची मलायकाची ही पहिलीच वेळ आहे. अखेर दोघांनीही त्यांच्या नात्याची जाहीर कबूली दिली आहे.

==============================================================

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...