मलायका-अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट, नीतू कपूर म्हणतात...

मलायका-अर्जुननं घेतली ऋषी कपूर यांची भेट, नीतू कपूर म्हणतात...

मलायकानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोवर नीतू कपूर यांची कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 5 जुलै : अभिनेता ऋषी कपूर सध्या अमेरिकेत कॅन्सरवर उपचार घेत आहेत. ऋषी कपूर यांच्या कठिण काळात अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी सुद्धा ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी देखील नुकतीच ऋषी कपूर यांची भेट घेतली आहे. ऋषी आणि नीतू कपूर यांनी नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मलायका आणि अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अभिनेता विद्युत जामवालनं असं पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा व्हिडिओ

ऋषी कपूर यांनी हा फोटो शेअर करताना त्याला कॅप्शनही दिलं, ‘मला भेटण्यासाठी धन्यवाद मलायका आणि अर्जुन. मी आशा करतो की, तुम्हा ‘रेड फार्म’मध्ये लंच कराल आणि ‘रॉकेटमॅन’ पाहू शकाल.’ ‘रॉकेटमॅन’ हा बॉलिवूड सिनेमा आहे. ऋषी कपूर यांच्या ट्वीटवरून, मलायका-अर्जुनचा लंच डेट नंतर ‘रॉकेटमॅन’ सिनेमा पाहण्याचा प्लान असल्याचं दिसून येतं.

याशिवाय मलायकानंही या भेटीच्या वेळचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिनं लिहिलं,'या सुंदर वेळासाठी धन्यवाद नीतू कपूर आणि ऋषी अंकल.' यावर नीतू कपूर यांनी कमेंट केली असून त्यांनी लिहिलं, 'कुटुंबातलाच मुलगा अर्जुन आणि प्रेमळ मलायका तुमच्या सोबत चांगली वेळ घालवला धन्यवाद' यावरून मलायकानं कपूर खानदानात तिचं स्थान पक्क केल्याचं दिसून येत आहे.

...म्हणून मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही

 

View this post on Instagram

 

Thank u @neetu54 n Rishi uncle for such a warm n lovely evening ♥️#Nyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

अर्जुन कपूर त्याच्या 34 व्या वाढदिवसा निमित्त मलायकासोबत न्यूयॉर्कला कवाना झाला होता. त्यानंतर हे दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. यावेळी त्यांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुलीही दिली. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन कपूरसोबतचं नातं आणि मुलगा अरहानबाबत मनमोकळेपणानं बोलली. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली माझ्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल लोक काय म्हणतात याकडे मी कधीच लक्ष नाही देत. मला फक्त माझा मुलगा, माझा जोडीदार आणि माझे मित्र माझ्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीने फरक पडतो. घटस्फोटानंतर नवं नातं माझ्यासाठी सोपं नव्हतं. मला खूप असुरक्षित वाटत होतं. पण मला एक नातं हवं होतं आणि ते मला मिळालं. मी या नात्यात खूप खुश आहे.

मुलगा अरहान आणि पूर्व पती अरबाज बाबत मलायका म्हणते...

==================================================================

SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 12:51 PM IST

ताज्या बातम्या