मलायकानं शेअर केला अर्जुन सोबतचा फोटो पण, ‘या’ कारणानं ओळखणं झालं कठीण

मलायकानं शेअर केला अर्जुन सोबतचा फोटो पण, ‘या’ कारणानं ओळखणं झालं कठीण

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं ऑफिशिअल केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून मलायका सतत अर्जुनसोबत फोटो शेअर करत आहे. सध्या हे कपल न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एंजॉय करत असून काही दिवसांपूर्वी मलायका अर्जुनच्या फॅमिलीसोबतही दिसली होती. मलायका आणि अर्जुन त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर न्यूयॉर्कला रवान झाले होते. त्यानंतर मलायकानं अर्जुनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर मलाकानं आता पुन्हा एकदा अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

'जीवलगा'तून गायब झालेली काव्या 'या' देशात करतेय एंजॉय, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

 

View this post on Instagram

 

#pride #onlylove #pride🌈 #pridenyc

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अर्जुनसोबतचा फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमध्ये त्या दोघांनीही मास्क घातल्यानं त्यांना ओळखणं कठीण झालं आहे. या फोटोला त्यांनी ‘Booo’ असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच्या अर्जुन आणि तिच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली होती. यावेळी तिनं त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं होतं. मलायका म्हाणाली, घटस्फोटानंतर मला कोणत्याही रिलेशिपवर विश्वास नव्हता. मी पुन्हा एकदा तुटेन अशी भीती मला वाटत होती. मला असं एक नातं हवं होतं मात्र त्याची मला खात्री नव्हती. पण मला जे हवं होतं ते मला मिळालं आणि त्यात मी खूप खुश आहे.

सलमान खानची हिरोईन अडचणीत, मोठ्या गुन्ह्यात पोलिसांनी पतीला केली अटक

यावेळी मलायकाने तिच्या आणि अर्जुनच्या वयातील अंतराबद्दलही आपलं मत स्पष्ट केलं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा वयातल्या अंतराचा फारसा फरक पडत नाही. ही दोन व्यक्तिंच्या मनातली भावना असते. पण आपण अशा समाजात राहतो जिथे वयाने मोठा मुलगा लहान मुलीला डेट केलं तर चालतं पण मोठ्या वयाच्या मुलीने वयाने कमी असलेल्या मुलाला डेट केलं तर समाजाला पटत नाही. मी अशा लोकांना फारशी भीक घालत नाही. असं मलायका म्हणाली होती.

भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलवणारा सौरव गांगुलीचा हा किस्सा दिसणार मोठ्या पडद्यावर

===========================================================================

VIDEO: चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्यानं ग्रामस्थांवर आस्मानी संकट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या