मुंबई, 18 मे : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या पदार्पणदाचा ट्रेंड सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेनं 'स्टूडंट ऑफ द इयर 2' बॉलिवूड डेब्यू केला. त्यानंतर आता एक नवी जोडी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी आणि संजय लीला भन्साळी यांची भाची शरमिन सेहगल भन्साळींच्याच 'मलाल' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
आज (18 मे) 'मलाल'चा ट्रेलर लाँच करण्यात आला. मुंबईमध्ये अनेक वर्षांपासून गाजत असलेला मुद्दा या सिनेमात मांडण्यात आला आहे. गेली अनक वर्ष नोकरीच्या निमित्तानं परप्रांतीयांचे लोंढे मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि आपल्या सर्व गोष्टींवर कब्जा करत आहेत. असं इथल्या मराठी माणसांना वाटतं आणि हा मुद्दा मागची अनेक वर्ष मुंबईतील मराठी आणि अमराठी लोकांमध्ये वादाचं कारण ठरत आहे. मुंबईतील नेमक्या याच प्रश्नावर हा सिनेमा भाष्य करतो असं ट्रेलरमध्ये दिसतं. यात मीजान मराठी मुलाची भूमिका साकारत आहे तर शरमिन एका अमराठी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
2008मध्ये आलेल्या 'सावरियां'मध्ये संजय लीला भन्साळींनी स्टार किड्स रणबीर कपूर आणि सोनम कपूरला लाँच केलं होतं त्यानंतर आता ते मीनाज आणि शरमिनला लाँच करत आहेत. 'मलाल'चं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांचं असून या सिनमाची निर्मिती भन्साळी आणि टी सीरिज मिळून करत आहेत. आपल्या भाचीच्या बॉलिवूड डेब्यूसाठी संजय लीला भन्साळींनी विशेष मेहनत घेतली आहे. 28 जूनला 'मलाल' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
...म्हणून कतरिना एक्स बॉयफ्रेंड सलमानचे फोटो लाईक करत नाही!
खरंच प्रियांका चोप्रा प्रेग्नंट आहे का ? मैत्रिणीनं केला 'हा' गौप्यस्फोट